पंढरपूर – आर्ट बिट्स फौंडेशन पुणे तर्फे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा कलावंतास दिला जाणारा ” कला गौरव” पुरस्कार या वर्षी युवा पिढीतील प्रसिद्ध तबला वादक अविनाश पाटील यांना जाहीत झाला आहे.या संस्थेचे हे पंचविसावे वर्ष आहे. पाटील हे पं. प्रमोद पाटील व पं. उमेश मोघे यांचे शिष्य आहेत. तबला वादनात त्यांनी संगीत अलंकार व एम ए तबला ही पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली आहे.
सवाई गंधर्व संगीत महोत्सवासह देशातील अनेक मानाच्या संगीत महोत्सवात त्यांनी आपली कला सादर केली आहे. परदेशातील दुबई, अबुधाबी, मालदीव, नेदरलँड्स, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, जर्मनी, पोलंड, स्पेन, आयर्लंड, स्कॉटलंड आणी लंडन येथी सोलो तबला वादन सादर करुन जगभरातील संगीत रसिकांची दाद मिळवली आहे.
पाटील यांनी कला क्षेत्रात स्व कर्तुत्वावर अतिशय चिकाटीने, कष्टाने, जिद्दीने, मेहनतीने संघर्ष करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतासह जगभरातील आज अनेक विद्यार्थी त्यांच्या कडे तबला वादनाची तालीम घेत आहेत.


















