सोलापूर – जुना विडी घरकुल येथील परमेश्वरी देवी हॉलमध्ये श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्ट, जे. एम सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. महेश विष्णुपंत कोठे याच्या ६२ वा जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये १११ रक्तदात्यांनी रक्तदान करून उस्फूर्त प्रतिसाद दिला आणि या शिबिरास बोल्ली रक्तपेढी व सिद्धेश्वर रक्तपेढीचे कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
जुना विडी घरकुल येथील श्री शंभोमारुती चॅरिटेबल ट्रस्ट, जेएम संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. महेश विष्णुपंत कोठे याच्या ६२ वा जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपाचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाघमारे, उपनिरीक्षक बंडगर, नगरसेवक प्रथमेश कोठे, सतीश सिरसिल्ला, विजय रामपुरे, वासू यलदंडी, अविनाश दासरी, अशोक इंदापुरे, संतोष सोमा, नागेश सरगम आदी उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत आयोजक नरेश कोलप्याक यांनी केले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद संकाराम, रवी बुगडे, शुभम वईटला, सागर गंजी, हेमंत दुधगुंडी, मधुकर बुगडे, अमर संगा, शिवराज कोंका, नवीन वंगारी, गोविंद बुगडे, कृष्णा कोलप्याक, अंबादास म्याकल, आकाश कोलप्याक, विनोद पुट्टा. ओंकार ब्राह्मणला आदीनी परिश्रम घेतले.

















