सोलापूर : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची परंपरे प्रमाणे रविवारी १९ एप्रिल रोजी एकच मिरवणूक व्हावी यासाठी पोलिस आयुक्त यांनी दोन्ही मध्यवर्तीची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या समस्या ऐकून त्याचे निराकरण करुन एक मिरवणूक करण्यासाठी तयार करावे आशयाचे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले.
ॲड. लौकिक इंगळे व नागेश इंगळे या दोन्ही मध्यवर्तींच्या अध्यक्षांना कार्यकाळात एक मिरवणूकीच्या पंरपरेला छेद देत दोन मिरवणूका होवू नये यासाठी दोघांनी आपल्या विश्वस्तांना बोलून एक मिरवणूक करण्यासाठी तयार करावे असे निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थापक देवा उघडे, अध्यक्ष आकाश इंगळे ,सचिव कांत उघडे , राज सुरते ,ॲड. अजय रणशृगांरे,सचिन वाघमारे,राज भोसले,शिलवंत काळे,युवराज बडेकर,शिल भोसले, मुरत निकंबे, शिलरत्न दुड्डे, मिनाज शेख,अतिश वाघमारे,आनंद माने,महेंद्र कांबळे,रोहन बनसोडे,विरसेन जाधव,दयानंद गायकवाड,आंनद माने,विशाल शेवाळे व कार्यकर्ते उपस्थित होते.




















