सोलापूर – सर्व जगात हिंदू संस्कृतीने समृद्ध असलेला आपला देश परकिय आक्रमणे , फंद फितूरी यामुळे खंडित झाला . आपल्या देशाला परत परम वैभावी करण्यासाठी हिंदू म्हणून आपण जात पात न मानता एक होणे काळाची गरज आहे . त्यासाठी प्रथम हिंदू म्हणून टिकायचे असेल तर इतिहास समजला पाहिजे असे उग्दार हिंदू महासभेचे ॲड . तुकाराम चिंचोलीकर यांनी काढले .
श्रीपूर ता . माळशिरस येथे विराट जागृती हिंदू संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असून या शंभर वर्षात संघाने केलेली सामाजिक कामे समाजा समोर यावीत तसेच संघाने दिलेल्या पंच परिवर्तनाचे प्रत्येकाने आचरण करावे यासाठी हिंदू सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते . संम्मेलनास शक्तिपात महायोग साधन चैतन्य कुटी (माळीनगर ) चे प . पू . स्वामी श्रीपाद तीर्थ महाराज , सामाजीक कार्यकर्ते संदीप सावेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .
प्रथम आशिर्वचनात स्वामी श्रीपाद तीर्थ यांनी संतानी दिलेल्या शिकवणुकी प्रमाणे आपले वर्तन व आचरण ठेवणे म्हणजेच हिंदू धर्म वाढविणे होय असे सांगून प्रत्येक घरामध्ये झानेश्वरी , तुकाराम गाथा , दासबोध , शिवचरित्र , गीता या धार्मिक ग्रंथांचे वाचन व मनन होणे गरजेचे असल्याचे सांगितले .
पुढे बोलतात चिंचणीकर यांनी सुमारे ६ व्या शतकानंतर भारतावर परकिय मुघल , डच, पोर्तुगिल , हुन यांची आक्रमणे चालू झाली ती छत्रपति शिवाजी महाराज यांच्या आगमना पर्यंत चालू होती . याकाळात मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या . तर इंग्रज राजवटीने ज्या गुरुकुलाच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीचे पाळेमुळे घट्ट रोवली होती ती शिक्षण पद्धत संपवून टाकली . त्याचे दुष्परिणाम म्हणजे जेनयू सारख्या विद्यपिठात भारत तेरे तुकडे होंगे इन्शा अल्ला सारख्या देशद्रोही घोषणा होत आहेत .
यामुळे आज सर्व हिंदूनी सावध होऊन एकत्र येणे हा एकमेव मार्ग असल्याचे सांगितले .
तर सावेकर यांनी रा . स्व . संघाचे सामाजिक समरता , पर्यावरण संरक्षण , कुटूंब प्रबोधन , स्व बोध , व नागरी कर्तव्य या पंच परिवर्तनाची माहिती दिली . याप्रसंगी रा . स्व . संघाचे तालुका संघचालक भिष्माचार्य कुदळे , ता .कार्यवाह बाळासाहेब खरात , महाळुंग – श्रीपूरचे माजी प . स . सदस्य अनिल जाधव , अनिल मुंडफणे , विक्रमसिंह लाटे , उद्योजक संदीप सुरेश घाडगे , जांबूडचे सरपंच राहूल खटके , ब्रिमा सागरले डे . मॅनेजर नरेश पाठक , सतीश डिंगरे उपस्थित होते .
प्रास्ताविक शेखर कुलकर्णी यांनी केले .प्रमुख अतिथींची स्वागत सुरज शिन्दे , मल्हारी जाधव यांनी केले . परिचय शाम मांगले तर प्रेरणा गित गजानन मोकाशी यांनी म्हटले
सुत्रसंचालन प्रा . नितीन देशपांडे यांनी केले .






















