सोलापूर – अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य तसेच उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा नुकत्याच झालेल्या निवडीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांना ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी वारकरी संप्रदायातील विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
विशेषतः माघवारी पालखी सोहळा, आषाढी वारी तसेच वारकरी परंपरेशी निगडित इतर विषय मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला.या सन्मानामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी जिल्हा परिषद व वारकरी मंडळ यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, प्रदेश अध्यक्ष जोतिराम चांगभले, शहर अध्यक्ष संजय पवार यांच्यासह अजिंक्य मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


















