पंढरपूर – आगामी सण, उत्सव, जयंती हे शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्याकडून रूट मार्च घेण्यात आला.
तसेच नागरिकांना आगामी उत्सव, जयंती शांततेत व सामाजिक सलोखा ठेवून साजरे करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर आक्षेपार्ह ,धार्मिक व सामाजिक सलोखा बिघडेल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही देण्यात आल्या. सदर रूट मार्च पंढरपूर शहरातील प्रमुख मार्गावरून घेण्यात आला.
या रूट मार्च मध्ये सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे चार पोलीस अधिकारी व ३३ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
























