सोलापूर – स्त्रियांचे उद्धारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त भीम प्रतिष्ठान कडून विविध उपक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले, शालेय साहित्य वाटप, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, तसेच “भेट संविधानाची” या उपक्रमातून संविधानाची प्रास्ताविके ची फ्रेम विविध शाळा, कार्यालये आणि मंडळांना भेट देण्यात येणार आहे.भीम प्रतिष्ठान गेलीस २६ वर्षे विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रतिष्ठान तर्फे सामाजिक कार्य करीत आहेत.
तत्पूर्वी प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार घालून भीम प्रतिष्ठान कडून अभिवादन करण्यात आले. यावेळी भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, संस्थापक दलितमित्र. बाबा बाबरे, सचिव अकबर शेख, मारुती खानापुरे, प्रेम अंकुश आदी पदाधिकारी उपस्थित होते.























