अकलूज – श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा अमृत आणि सुवर्ण पट्टाभिषेक महोत्सवानिमित्त ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल चार दिवस चालू झाली आहे आज रविवारी दुपारी 4.00 ते रात्री 8.00 या वेळेत पंचाचार्य जगद्गुरूंची भव्य-दिव्य अड्डापालखी मिरवणुक सोहळा पालखी मैदान ते श्री बृहन्मठ पर्यंत भव्य असा सोहळा निघाला लेझीम महिलांचे ढोलीबाजा पथक विविध धार्मिक वाद्य कलश धारक महिला घोड्यावर सत्कारमूर्ती श्री गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज व श्री सद्गुरु सदाशिव शिवाचार्य महाराज आरुड झाले होते.
तदनंतर श्री रंभापुरी जगद्गुरु, श्री उज्जैन जगद्गुरु ,श्री शैल्य जगद्गुरु ,श्री काशी जगद्गुरु , डॉक्टर मल्लिकार्जुनश्री काशी जगद्गुरु यांची अड्डा पालखी तर सोहळ्यासाठी उपस्थित शिवाचार्य गण यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली तर नंतर रेणुकाचार्य यांचा सजवलेला रथ व अनेक भक्तगण मिरवणुकीत सहभागी झाले या सोह सोहळ्यासाठी हजारो भक्तगण गेले तीन दिवस उपस्थित आहेत मिरवणुकीनंतर हिंदू वीरशैव लिंगायत समाज पंचाचार्य जगद्गुरू यांचे दिव्यसानिध्यात व अनेक शिवाचार्य यांच्या उपस्थितीत धर्मसभा संपन्न होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले सोमवार दिनांक13. मुख्य कार्यक्रम होणार आहे पंचाचार्य जगद्गुरूंच्या दिव्यसानिध्यात श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना हरिद्रलेपन व अभ्यंग स्नान संपन्न होवून सकाळी 10.30 वाजता पंचाचार्य जगद्गुरु तसेच, उपस्थित शिवाचार्य, संत-महंत, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मसभा संपन्न होईल आणि नंतर उपस्थितांसाठी महाप्रसाद होईल.
तरी सदरच्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह देशातील सर्व हिंदू वीरशैव लिंगायत समाज बंधु-भगिनींनी व सद्गभक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून पंचाचार्य जगद्गुरू दर्शनाचा, कार्यक्रमांचा व गुरूकृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार ऐतिहासिक वेळापूर नगरी धार्मिक कार्यक्रमाने गजबजून गेली आहे
श्री रंभापुरी जगद्गुरु, श्री उज्जैन जगद्गुरु ,श्री काशी जगतगुरु चंद्रशेखर महास्वामी, काशी जगद्गुरु श्री डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी,श्री शैल्य जगद्गुरु या सर्वांचा एकत्रित दर्शनाचालाभ झाला
























