वेळापूर – नीरा उजवा कालवा विभाग फलटण मार्फत चालू उन्हाळा हंगाम दिनांक १/३/२०२६ ते ३०/६/२०२६ पर्यंत शेती सिंचनासाठी जाहीर प्रकटन करून लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मागणी करण्याबाबत कळवल्यावरून अनेक शेतकऱ्यांनी रोखीने पाणी पट्टी भरून रीतसर पाणी मागणी केलेली आहे चालू उन्हाळा हंगामासाठी पहिले आवर्तन ४/३/२०२६ पासून सुरू करण्यात आले आहे. कालव्याला ४१ दिवस झाले आहेत. पंढरपूर, सांगोला, माचनूर उपविभाग माळशिरस, फलटण या सर्व विभागांना प्राधान्याने पाणी सोडण्यात आले आहे.
माचनूर विभागातील वेळापूर शाखा अंतर्गत क्षेञास मुद्दाम उशिरा व कमी दाबाने पाणी सोडण्यात आले आहे. शेजारी माळशिरस विभागातील खंडाळी ब्रांचला सुरुवातीला पूर्ण दाबाने पाणी देऊन महाळुंग व खंडाळी शाखे अंतर्गतचे सिंचन ४/३/२०२६ ते २३/३/२०२६ पर्यंत १९ दिवसातच पूर्ण केले आहे. वेळापूर शाखा अंतर्गत वितरिका क्रमांक चार वरील डी फोर कॅनलला २३/३/२०२६ पासून पाणी देण्यात आले आहे मात्र वितरिका क्रमांक चार वरील माळखांबी मायनर फाट्याला पाणी सोडण्याबाबत गेली पंधरा दिवस झाले तरी ही शेतकऱ्यांनी विनंती करून नही दिनांक ११/४/२०२६ रोजी मुद्दाम कमी दाबाने पाणी सोडले आहे माळखंबी मायनर कॅनल वरील सिंचन होण्यास २५ ते ३० दिवस लागणार असल्याने हेड कडील पिके पाण्याअभावी जळून पूर्ण नष्ट होणार आहेत व मुळातच पाणी उशिरा सोडल्याने व उन्हाची तीव्रता वाढल्याने सध्या पिके जळाली आहेत आत्ता पाणी देऊनही उपयोग होणार नाही उलट वेळापूर शाखेंतर्गत असणाऱ्या डि फोर कॅनलला पाणी सोडून २२ दिवस झाले आहेत.डि फोर कॅनलवरील १०० पेक्षा जास्त शेतकरी सायपन द्वारे बेकायदेशीर पाणी वापर करीत आहेत तसेच विहरी मध्ये तळ्यामध्ये पाणी सोडून भरून घेत आहे त्याकडे पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याचे लक्ष नसून त्यांच्याच कृपेने कालव्यालगतचे शेतकरी बेकायदेशीर पाणी वापर करत आहेत. यावेळी शाखाधिकारी यांना समक्ष बेकायदेशीर पाण्याची परिस्थिती दाखवली ते मूग गिळून गप्प बसत आहेत.
उलट माळखांबी मायनरला डिफोर बरोबर पाणी देणे गरजेचे असताना सदर कॅनलला पाणी लवकर न दिल्या मुळे माळखांबी मायनर क्षेञातील पिके पाण्याअभावी जुळून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, रोखीने पाणीपट्टी भरून रितसर पाणी मागणी करुन माळखांबी मायनर शेतकर्यांना पाणी देण्याबाबत गेली १२ ते १३ वर्ष वेळापूर पाटबंधारे खाते अन्याय करत आहे.
प्रत्येक निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधी अन्यायाबाबत अश्वासन देऊन दिशाभूल करतात मात्र निवडणूक झाल्यानंतर येरे माझ्या मागल्या प्रमाणे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतात व दिलेली आश्वासने विसरतात माळखांबी मायनर कॅनलवरील अन्याय बाबत शेतकरी विनंती अर्ज उपोषणे निवेदन सर्व प्रकारे विनंती करूनही शेतकऱ्यांना आश्वासनाशिवाय काय मिळत नाहीअसे सावता परिषद प्रदेश उपाध्यक्ष महादेवभाऊ ताटे यांनी पाण्याबाबतचे व्यथा सांगताना व्यक्त करुन महादेव ताटे म्हणालेकी पाटबंधारे खात्याचा सततच्या अन्यायाविरुद्ध व संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध मी न्यायालयात दात मागणार असल्याचे त्यांनी सांगितले
























