Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

H3N2 आणि H1N1 चे तिहेरी संकट; घाबरू नका, वाचा जीवघेण्या संसर्गाची खरी माहिती….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 15, 2023
in india
0
H3N2 आणि H1N1 चे तिहेरी संकट; घाबरू नका, वाचा जीवघेण्या संसर्गाची खरी माहिती….
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतात करोनाचा धोका कमी झाल्यानंतर सर्वकाही सुरळीत चाललं असताना आता पुन्हा एकदा देशात व्हायरसचा धोका वाढला आहे. देशात एकसाथ तीन व्हायरसचा धोका वाढल्याने रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्याही वाढताना दिसत आहे. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये करोना म्हणजेच कोव्हिड -१९, H3N2 आणि H1N1 चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अधिक माहितीनुसार, १८ फेब्रुवारीपर्यंत देशभरात H1N1 ची ९५५ प्रकरणं समोर आली आहेत. या संसर्गाला स्वाइन फ्लूही म्हटलं जातं.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘देशात सर्वाधिक H1N1 प्रकरणं गी तामिळनाडूमध्ये ५४५, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये १७०, केरळमध्ये ४२ आणि पंजाबमध्ये २८ रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाहीतर, आयडीएसपीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यामध्ये देशात श्वासाचे रोग आणि इन्फ्लूएंझा (एआरआय/आयएलआय) ची ३ लाख ९७ हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत, जी वाढून फेब्रुवारीमध्ये ४ लाख ३६ हजार इतकी झाली. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मार्चच्या पहिल्या ९ दिवसांतच इन्फ्लूएंझाची १ लाख ३३ हजार रुग्ण आढळून आली आहेत. यामुळे देशावर धोका वाढत आहे.

मॅक्स साकेतच्या इंटरनॅशनल मेडिसिनचे डायरेक्टर डॉक्टर रोमेल टिकू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ताप असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी होत नाही आणि ती करण्याचीही गरज नाही. पण, देशात व्हायरल इन्फेक्शनची सरमिसळ सुरू आहे, हे खरं आहे. यामुळे करोना, , H3N2 आणि H1N1 च्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशात वृद्ध आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना याचा धोका जास्त असून रुग्णालयात दाखल लोकांची संख्याही यामुळे वाढत आहे.

स्वाईन फ्लू H1N1, इन्फ्लुएंझा H3N2 किंवा करोना हे तिन्ही संसर्गजन्य आजार असून विषाणूंद्वारे या रोगाचा फैलाव होतो. त्यामुळे मास्क वापरणं यापासून वाचण्यासाठी उत्तम आहे. देशात आतापर्यंत या संसर्गामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता आहे. अशात मास्क घालून घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मंत्रालयाने जारी केलेल्या डेटानुसार, SARI किंवा ILI ग्रस्त रुग्णांच्या नमुन्यांच्या चाचणीमुळे सुमारे ७९ टक्के लोकांमध्ये इन्फ्लूएंझा ए ची पुष्टी झाली आहे. अशात, तब्बल १४ टक्के प्रकरणांमध्ये इन्फ्लूएंझा बी व्हिक्टोरियाची पुष्टी झाली आहे. इन्फ्लूएन्झा बी देखील एक उपव्हेरिएंट आहे. इतकंच नाहीतर, ७ टक्के लोकांमध्ये H1N1 म्हणजेच स्वाइन फ्लूची पुष्टी झाली आहे, हा तिसरा आणि सर्वात सामान्यपणे आढळणारा इन्फ्लूएंझा विषाणू आहे.

सध्या देशामध्ये काही जिल्ह्यांत करोनाच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. यामध्ये दिल्लीत कोविड पॉझिटिव्हिटी दर ३.२४% आहे. दिल्लीत ४०१ नमुन्यांची चाचणी केल्यानंतर १३ लोक कोविड पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं.

दरम्यान, इन्फ्लूएंझा सारख्या आजारासाठी सतर्क राहण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून याबद्दल सूचना दिल्या आहेत. या संसर्गाची लागण होणाऱ्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अशी लक्षणं दिसतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

खूप ताप येणं, त्वचा उबदार व ओलसर होणं, चेहरा लाल होणं, डोळे पाणावणं, सर्दी, अंगदुखी, कफ नसलेला खोकला, डोकेदुखी इ. ही या आजारांची गंभीर लक्षणं आहेत. अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वेळीच उपचार घेणं महत्त्वाचं आहे. तर यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मास्क वापरणे, गरम पाण्याचे सेवन करणे, योग्य आणि पौष्टिक आहार ठेवणे.

हा फ्लू अत्यंत संसर्गजन्य आहे. तोंडातून आणि नाकातून पडणाऱ्या थेंबांद्वारे हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. त्यामुळे स्वच्छता राखणे, तसेच मास्क घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसातून वारंवार हात धुवा, सॅनिटायझर वापरा आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहा. तसेच सर्दी, खोकला आणि इतर लक्षणे असलेल्या लोकांपासून अंतर ठेवा. जेवताना हात धुतल्याशिवाय खाऊ नका. बाहेर कुठेही स्पर्श केला असेल तर लगेच तोंडाला किंवा नाकाला हात लावू नका.

Post Views: 84
Previous Post

VIDEO | मुंबईच्या दिशेनं लाल वादळाचं झंजावती दृश्य; ड्रोन मधून टिपला शेतकऱ्यांचा थक्क करणारा मोर्चा…..

Next Post

LIVE : महाविकास आघाडीच्या बैठकीतून उद्धव ठाकरे लाइव्ह….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE : महाविकास आघाडीच्या बैठकीतून उद्धव ठाकरे लाइव्ह….

LIVE : महाविकास आघाडीच्या बैठकीतून उद्धव ठाकरे लाइव्ह....

ताज्या बातम्या

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

सोयगाव शहरात पहिल्या बाल उद्यानाचे उद्घाटन संपन्न

April 21, 2026

पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून ; चुलतीनेच केला पुतण्याचा खून ..

April 21, 2026

पूर्णा नदी पात्रातून अवैध्य वाळू उपसा ; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

April 21, 2026

गंधोदक हे केवळ जल नसून सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत

April 21, 2026

वाफळे येथे २७ एप्रिलला जिल्हा किशोर- किशोरी खो-खो स्पर्धा ..

April 21, 2026

मंठा तालुक्यात अनधिकृत रित्या अवैध्य वाळू उपसा

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822195

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697