सोलापूर – शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच महिला गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पोटविकार तज्ञ ) म्हणून डॉ. तनुश्री परळे या स्पंदन कार्डियाक अँड गॅस्ट्रो क्लिनिक आणि अश्विनी हॉस्पिटल , सोलापूर येथे रुग्णसेवा सुरू करणार आहेत.
डॉ. तनुश्री यांनी आपले संपूर्ण वैद्यकीय प्रशिक्षण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्थांमधून पूर्ण केले आहे. त्यांनी मुंबईतील सायन हॉस्पिटलमधून एमबीबीएस केल्यानंतर प्रतिष्ठीत के.इ.एम हॉस्पिटल आणि सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज, (मुंबई) येथून एमडी (मेडिसिन) पूर्ण केले. त्यांचे गॅस्ट्रोएंन्टेरोलॉजी म्हणजेच पोट व लीव्हरच्या आजारांवरील सुपर स्पेशियालिटी ट्रेनिंग मुंबईतीलच प्रख्यात पी .डी . हिंदुजा हॉस्पिटल येथून झाले आहे . यानंतर त्यांनी इआरसीपी आणि इयूएस यांसारख्या अत्याधुनिक शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण मॅक्स हॉस्पिटल साकेत (दिल्ली) येथे पूर्ण केले .
आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत अत्यंत कठीण समजली जाणारी युरोपियन स्पेशालिटी एक्सामिनॅशन (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी) (ESEGH) उत्तीर्ण करून डेन्मार्कमधील आरहूस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल (AUH) येथे पोटविकारांचे पुढील प्रशिक्षण घेतले आहे.
डॉ. तनुश्री परळे या सोलापूरमधील अश्विनी हॉस्पिटल येथे सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळेत उपलब्ध असतील. स्पंदन कार्डियाक अँड गॅस्ट्रो क्लिनिक, सातरस्ता येथे दुपारी २ ते ५ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ऊपलब्ध असतील.



















