सोलापूर – झपुर्झा आर्ट गॅलरी डलरिन चौक येथे आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूरतील जेष्ठ चित्रकार सुदर्शन देवरकोंढा यांच्या शुभहस्ते व प्राध्यापक दीपक देशपांडे, शेरशाह डोंगरी, शशिकांत सदाफुले यांच्या उपस्थितीत चिञ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
सदर प्रसंगी महेश सदाफुले यांनी रेखाटलेल्या चित्रांचे सर्व पाहुण्यानी कौतुक केले.त्यांचे पेन्सिल माध्यमातून रेखाटलेले सर्व चित्र उल्लेखनीय अशीच आहेत.
या प्रदर्शनात शहरातील सर्व चित्रकला शिक्षक कलाप्रेमी उपस्थित होते . प्रदर्शन 15 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत सर्व नागरिकांसाठी खुले आहे कार्यक्रमास कलाकार पुष्कराज गोरंटला, धर्मराज रामपुरे,अमर कनकी, चंद्रकांत गंजी, संतोष भालेराव, शांताप्पा काळे, आकाश नंदुर, दया पटणे, सिद्धाराम नालवार,मयूर सदाफुले व फैय्याजशेख उपस्थित होते….



















