सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक तसेच विद्यार्थी परिषद सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शैक्षणिक, क्रीडा व विविध सहशालेय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट निरोप (Best Outgoing) विद्यार्थ्यांचीही घोषणा करण्यात आली.
मेकॅनिकल विभागातून कु. सृष्टी शंकर नवले, ई&टीसी विभागातून स्वरूप जयंत आराधे व श्रावणी शंकर नवले, इलेक्ट्रिकल विभागातून कु. संजना टाळकोकुळ, तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातून उदय किशोर मोरे व भार्गव गोविंद कटकम यांची उत्कृष्ट निरोप विद्यार्थी म्हणून निवड झाली. तसेच, रोहित दत्तात्रय शाळगर (९५ टक्के) यांना उत्कृष्ट उपस्थिती तर विशाल कुंडलिक मोते (८८.१ टक्के) यांना उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.
याशिवाय माजी विद्यार्थी (Alumni) पुरस्कारांतर्गत ‘विक्रम पुरस्कार’ स्वरूप आराधे (बीटेक ई&टीसी), ‘अर्जुन पुरस्कार’ अब्दुल बिद्रे (बीटेक मेकॅनिकल) आणि ‘जब्बार पुरस्कार’ प्रांजल शिंदे (टी.वाय. मेकॅनिकल) यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, सिंहगड सीआरटीडीचे संशोधन संचालक प्रा. एस. एच. पवार, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, प्रा. पी. पी. तपकिरे, डॉ. रवींद्र बिरादार, प्रा. एच. टी. गुरमे, प्रा. सुवर्णा क्षीरसागर, प्रा. एस. पी. सगट आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर विविध क्षेत्रांत उत्कृष्टता साधावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन विद्यार्थी परिषद सदस्यांनी केले.


















