Monday, August 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

येडेश्वरी यात्रा काळात नियोजन यशस्वी; एसटी च्या उत्पन्नात ६२ लाख ६६ हजारांची वाढ.!

तरुण भारतbyतरुण भारत
April 18, 2026
in editor
0
येडेश्वरी यात्रा काळात नियोजन यशस्वी; एसटी च्या उत्पन्नात ६२ लाख ६६ हजारांची वाढ.!
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव  – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धाराशिव विभागाच्यावतीने येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेसाठी भाविकांच्या सेवेसाठी धाराशिव, उमरगा, भूम, तुळजापूर, कळंब व परंडा या आगारातून १२४ बसेस भाविकांच्या सेवेसाठी धावल्या. दि.१ ते ५ एप्रिल दरम्यान १ हजार ३६८ बसच्या फेऱ्या करण्यात आल्या. या माध्यमातून विभागाला ६२ लाख ६६ हजार ५७८ रुपये उत्पन्न झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी दिली आहे.

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या यात्रेसाठी लाखो भाविक दरवर्षी दर्शन घेण्यासाठी येरमाळा नगरीत दाखल होत असतात. या यात्रे दरम्यान भाविकांची प्रवासाची गैरसोय होऊ नये यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार धाराशिव विभाग नियंत्रक पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापक यांच्याशी समन्वय साधून नियोजन केले. त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुकर आणि सोयीचा करून दिला. या माध्यमातून एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही देखील घसघशीत भर पडली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धाराशिव विभागाने १ एप्रिल ते ५ एप्रिल या कालावधीत खास भाविकांच्या सोयीसाठी विशेष प्रवास बससेवा राबवली. या कालावधीत धाराशिव, उमरगा, तुळजापूर, कळंब, भूम आणि परंडा या आगारांतून एकूण १२४ बस चालवण्यात आल्या. या बसेनी १३६८ फेऱ्या पूर्ण केल्या. त्यासाठी १० लाख ९३ हजार ३१० किलो मीटर अंतर पार केले. यात्रे दरम्यान १ लाख ४१ हजार ९५५ प्रवाशांनी एसटीचा प्रवास करत एकूण ६२ लाख ६६ हजार ९७८ रुपयांचे उत्पन्न मिळाली आहे. योग्य नियोजन केल्यामुळे यात्रे कालावधीत एका देखील भाविकाला वाहतुकीची अडचण भासली नाही.
विशेष म्हणजे, तुळजापूर आणि कळंब आगारांनी सर्वाधिक फेऱ्या आणि उत्पन्न मिळविले आहे. तर धाराशिव आगारातून सर्वाधिक बस सोडण्यात आल्या. यात्रेत लाखो भाविकांची गर्दी असताना देखील शिस्तबद्ध नियोजनामुळे वाहतूक व्यवस्थेवर कोणताही ताण जाणवला नाही किंवा वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली नाही. विशेष म्हणजे नियमितपणे सर्व बसेस भाविकांना नेण्याचे आणि आणण्याचे काम करीत होत्या. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एसटी अधिकाऱ्यांनी केवळ प्रवाशांची गैरसोय टाळण्यावरच भर दिला नाही, तर एसटीच्या उत्पन्न वाढीकडेही विशेष लक्ष केंद्रित केले. जादा बसची कार्यक्षम नियोजनबद्ध रचना केल्यामुळे उत्पन्नात भर पडली. पालकमंत्री सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग नियंत्रक पाटील यांनी केलेल्या अंमलबजावणीमुळे एसटी महामंडळाने हे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे यात्रेच्या काळात वाहतूक व्यवस्थित पुरवणारी यंत्रणा फक्त एसटी महामंडळात व्यवस्थितपणे पुरवू शकते हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

आगार निहाय बसची संख्या, बसच्या एकूण फेऱ्या, कापलेले अंतर किलो मीटरमध्ये, मिळालेले उत्पन्न व प्रवासी संख्या पुढील प्रमाणे – धाराशिव आगार एकूण बस संख्या २२, एकूण केलेल्या फेऱ्या १८६, कापलेले अंतर ११८२३ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न ८०४८३८ रुपये व प्रवासी संख्या – १२०८७, उमरगा आगार एकूण बस संख्या ७, एकूण फेऱ्या ४४, कापलेले एकूण अंतर ६२३२ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न ३२६४५९ रुपये व ३६५१ प्रवासी संख्या तसेच भूम आगार एकूण बस संख्या – २१, एकूण केलेल्या बस फेऱ्या – २२८, कापलेले अंतर – १५१११ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न – १०८८४० रुपये व प्रवासी संख्या – १३८६९ तर तुळजापूर आगार एकूण बस संख्या – २४, एकूण बस फेऱ्या – ३७०, एकूण कापलेले अंतर २८७५४ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न – १५१८४३८ रुपये व प्रवासी संख्या – २४६९९ तर कळंब आगार एकूण बस संख्या – २४, एकूण केलेल्या फेऱ्या – २६५, कापलेले अंतर – ३०१४१ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न – १७३३४८७ रुपये व २४६७१ प्रवासी संख्या आणि परंडा आगार बसची संख्या – २०, एकूण केलेल्या फेऱ्या – २७५, एकूण कापलेले अंतर – १७३२२ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न – ९७४५१६ रुपये व प्रवासी संख्या – १६१३७ अशा एकूण १२३ बसेस विभागातून यात्रेसाठी धावल्या असून त्यांनी १ हजार ३६८ यात्रेसाठी प्रवास फेऱ्या मारल्या तर १ लाख ९ हजार ३९० किलो मीटर अंतर कापले तसेच एकूण मिळालेले उत्पन्न – ६२ लाख ६६ हजार ५७८ रुपये आणि ९४ हजार ११४ प्रवाशांनी यात्रेसाठी हजेरी लावली. एकंदरीतच येडेश्वरी देवी एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नासाठी पावली असल्याचे चित्र दिसत आहे.

Post Views: 47
Previous Post

पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा जपण्याचे आवाहन – कॉ. अशोक ढवळे

Next Post

एन बी नवले सिंहगड कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
एन बी नवले सिंहगड कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

एन बी नवले सिंहगड कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

ताज्या बातम्या

बार्शीत महिलेचे २ ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

August 2, 2026
मंगळवेढ्यात शिवसैनिक आक्रमक! खासदार संजय राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा देत युवासेनेकडून प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक

मंगळवेढ्यात शिवसैनिक आक्रमक! खासदार संजय राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा देत युवासेनेकडून प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक

August 2, 2026
संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचे आंदोलन

संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचे आंदोलन

August 2, 2026

योगेश कबाडे यांची मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या मुख्याधापक पदी निवड 

August 2, 2026
जिजाऊ गुरुकुलची पहिली पालक सभा उत्साहात संपन्न

जिजाऊ गुरुकुलची पहिली पालक सभा उत्साहात संपन्न

August 2, 2026
गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.

गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.

August 2, 2026
महसूल विभागाचे निर्णय लोकहिताचे…. आ . उत्तमराव जानकर 

महसूल विभागाचे निर्णय लोकहिताचे…. आ . उत्तमराव जानकर 

August 2, 2026
श्रीकांत बंडगर यांची ‘पंजाब कुस्ती कोच’पदी शासकीय निवड

श्रीकांत बंडगर यांची ‘पंजाब कुस्ती कोच’पदी शासकीय निवड

August 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1024303

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!