सोलापूर – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन आणि ग्रीन फिंगर्स स्कूल, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विजय चषक’ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर ५ मे पासून करण्यात आले आहे.
ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघास ११ हजार तर द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येईल. याव्यतिरिक्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ५ वैयक्तिक बक्षिसेही दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे, ही स्पर्धा फक्त पहिल्या १६ संघांसाठी मर्यादित असून ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ दिले जाईल. स्पर्धेचा अंतिम सामना १२ जून रोजी खेळवण्यात येईल.
सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे टूर्नामेंट कमिटी चेअरमन संजय वडजे यांनी सांगितले की, सर्व सामने सकाळी ९:३० वाजता सुरू होतील, त्यामुळे संघांनी सकाळी ९ वाजेपर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे. जर एखादा संघ सकाळी १० वाजेनंतर मैदानात पोहोचला, तर प्रतिस्पर्धी संघाला ‘बाय’ देऊन पुढील फेरीत प्रवेश दिला जाईल. इच्छुक संघांनी ३ मे २०२६ पर्यंत राजू रंगम (मो. ९४२१०२७७८४) यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत. याच दिवशी दुपारी १२ वाजता स्पर्धेचे गट निश्चित केले जातील.

























