पिलीव – माळशिरस तालुक्यासह पिलीव परिसरात सध्या सुर्य आग ओकत आहे .सध्या उन्हाळ्यातील शेवटचा म्हणजे मे महीना सूरु आहे .त्यातच यंदा पिलीव परीसरातील तापमानाने उच्चांक गाठला आहे .तापमान 42 पर्यंत पोहचले आहे .तर उष्णतेचा कहर आहे.सुळेवाडी ,बचेरी, शिंगोर्णी या गावातील विहीरीनी तळ गाठला आहे.काही विहिरींना थोडेफार पाणी आहे पण त्यासाठी विजच नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे .कारण पिलीव परीसरातील ग्रामीण भागात सध्या चौथा ते पंधरा तास बघायला सुद्धा मिळत नाही.शासन म्हणतेय शेतकऱ्यांना शेतीपंपाला आठ तास दिवसा मोफत विज पण याचा पुरता बोजवारा उडाला आहे.यामुळे पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा विजे अभावी गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.पिलीव गावठाण मध्ये फक्त नियमीत वीजपुरवठा केला जात आहे .पण ग्रामीण भागातील बचेरी, सुळेवाडी, शेरी फीडर, कुसमोड जुना व नवा फिडरवर तसेच चांदापुरी, नवीन शेरी ,शिंगोर्णी या फिडरवर तब्बल चौथा तासापेक्षा जास्त लोडशेडिंग केले जात आहे.सकाळी सहा आठ ,त्यानंतर आठ ते चार व संध्याकाळी पुन्हा सहा ते दहा असे लोडशेडिंग तेही इमरजिंयनशी लोडशेडिंग या नावाखाली मेसेज टाकुन लोडशेडिंग केले जाते .
ऐन उन्हाळ्यात अश्या प्रकारची विदारक परिस्थिती ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. संध्याकाळी तर जनावरांना पाणी, दुध काढण्यासाठी, वैरण बारीक करण्यासाठी, दळण दळणयासाठी अश्या अनेक कारणांसाठी विजेची अत्यंत आवश्यकता असते .पण ग्रामीण भागातील ह्या लोडशेडिंग मुळे शेतकरी व सर्व सामान्य नागरिक ऐन उन्हाळ्यात अक्षरश हतबल झाला आहे.
माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार व खासदार यांनी यावर तोडगा काढुन दिलासा देणे आवश्यक असताना .विद्यमान आमदार याबाबत माजी आमदारावर टिका करुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना असा प्रश्न सर्वसामानयामधुन विचारला जात आहे .



























