सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ सामाजिक न्यायासाठीच नव्हे तर कामगारांच्या हक्कांसाठीही मोठे कार्य केले. भारतात ८ तास कामाचा नियम लागू करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कामगारांना साप्ताहिक सुट्टी, मातृत्व रजा, वेतनासह रजा यांसारख्या सुविधा मिळवून दिल्या, असे प्रतिपादन महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी डॉ.रत्नराज जवळगेकर यांनी केले.
नवी पेठ येथील महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि महापालिका स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण मंडळाच्या आवारात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी डॉ.रत्नराज जवळगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने, महानगरपालिका लेखा अधिकारी सदानंद वाघमोडे, मुख्य लिपिक माहेजबीन शेख, लेखापाल मल्लिकार्जुन हिरेमठ, पर्यवेक्षक मनीष बांगर, सुरेश कासार, रजनी राऊळ, निलोफर सय्यद, तरंगिणी कोंडा, सुवर्णा गुरव प्रफुल्ला कदम महेश वालावलकर, सारंग अंजीखाने, अविनाश शिंदे, रियाज आत्तार, अमोल गायकवाड, लक्ष्मण पुजारी, सचिन वर्मा , रियाज सय्यद, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक पांडुरंग माने, मुकुंद चंदनशिवे, अबरार डोंगरी, तुकाराम भोसले, भालचंद्र साखरे, सायली ढोले, नाशिर खान, सचिन साखरे आदी उपस्थित होते.
महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी डॉ.रत्नराज जवळगेकर पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी कामगारांसाठी कायदे आणि धोरणे तयार करताना मानवी सन्मान आणि समानता यावर भर दिला. त्यांनी कामगार धोरणांमध्ये ऐतिहासिक बदल घडवले. कामगार दिन साजरा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आठवण ठेवणे आवश्यक आहे. कारण आज कामगारांना मिळणारे अनेक हक्क हे त्यांच्या दूरदृष्टीचे फलित आहेत.


























