वेळापूर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांची राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल कुर्डुवाडी येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा कुर्डुवाडी शहर व माढा तालुका वासीयांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, माळशिरस तालुक्यातील राज्य कार्यकारणी, पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी तसेच युवक आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माळशिरस तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी केले आहे.
सदर कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे , प्रदेश सचिव सुनील सर्वगोड , तसेच रिपाइं प्रदेश उपाध्यक्ष बापुसाहेब जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
हा नागरी सत्कार सोहळा मंगळवार, दिनांक ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता तुळजाई लॉन्स, कुर्डुवाडी (करमाळा रोड) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहून सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


























