वेळापूर – जिद्द, संघर्ष आणि अथक परिश्रमाच्या जोरावर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या सानिका वाडकर, सद्दाम शेख,प्रज्वल धनवटे,कर्तव्य धनवटे, नागेश साठे, आणि सौ. मनीषा शिवाजी धनवटे यांचा गौरवपूर्ण सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या वतीने करण्यात आले होते.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ. मीनाक्षी मिलिंद सरतापे, वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे, शहराध्यक्ष शरद साबळे, बॉबी वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वायदंडे, माजी सदस्य गणेश साठे, लहुजी फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित साठे, धनाजी धांडोरे, प्रदीप वाडकर, दादा शिवपालक, ओंकार सरतापे, प्रथमेश केसकर, एकनाथ बाबळे, विश्वतेज सरतापे, ऋषी मगर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रजनीश बनसोडे होते. यावेळी बनसोडे, मिलिंद सरतापे, हनुमंत वायदंडे व अजित साठे यांनी मनोगत व्यक्त केले. बोलताना रजनिशबनसोडे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम व कठोर शारीरिक मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, त्यांचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
—————————————
अनंत अडचणींवर मात करत, खडतर संघर्षाच्या वाटेवरून जिद्दीने पुढे जात आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर धनवटे कुटुंबातील दोन सख्या भावांनी महाराष्ट्र पोलीस सेवेत, मुंबई पोलीस होण्याचा मान पटकावला. ही केवळ नोकरी नसून स्वप्नपूर्ती, कष्ट आणि जिद्दीची जिंकलेली लढाई आहे. त्यांच्या या यशामागील आई-वडील व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन, असे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी नमूद केले.























