पंढरपूर – तालुका पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जेसीबी च्यासाह्याने ६ मे रोजी मोठा खड्डा करून पंचांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण तीन लाख रुपये किमतीची देशी-विदेशीबनावटीची दारू व बियर नष्ट केल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठपोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.
या कारवाई संदर्भात माहिती देताना मुजावर यांनी सांगितले की, पंढरपूर तालुका पोलिसांनी वेगवेगळ्या एकूण १०७ गुन्ह्यातीलजप्त दारू बुधवारी (ता.६) जेसीबीच्या साह्याने खड्डा करून संपूर्ण जेसीबीच्या साह्याने बाटल्या फोडूननष्ट केली आहे.
दरम्यान सदरची दारू पोलीस स्टेशनला अनेक दिवसा पासून जप्त होती. त्याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी संबंधित विभागाला पाठपुरावा करून एकूण तीन लाख रुपयांची देशी-विदेशी दारू व बियर नष्ट केलेली आहे. एकूण १०७ दारूच्या गुन्ह्यातील मुद्देमाल नष्टकरून मुद्देमालाची निर्गती करण्यात आलेली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्यामार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, महिला पोलीस हेडक्वान्स्टेबल मनेरी, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख, पोलीस पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, कॉन्स्टेबल सुजित उबाळे, महिला पोलिस हवालदार कदम यांच्या पथकाने केली.























