अक्कलकोट – सोलर चे प्रमाण वाढले आहे विजेचा सध्या तुटवडा नाही. तरीही अक्कलकोट शहरातील वीज पुरवठा अचानकपणे खंडीत होत आहे . त्याचा वयोवृद्ध व्यक्ती आणि नवजात शिशु बालक, लहान मुलांना त्याचा ञास होत असल्याने त्याविरोधात बुधवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले च्या वतीने अक्कलकोट महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना अक्कलकोट नगरपरिषदेचे नगरसेवक आरोग्य सभापती तथा रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या मे महिन्यात तापमान 44 ते 45 अक्कलकोट चा तापमानाचा पारा असल्याने शासनाच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गरज असेल तर बाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नये असे जनहितार्थ आवाहन केले आहे. मात्र सहा तास पेक्षा अधिक काळ बुधवारी वीज खंडीत केली . संध्याकाळी ६.३० वाजले तरी भिमनगर मैंदर्गी रस्ता भागात विज पुरवठा झाला नाही .
महावितरणकडून व्यवस्थित वीज पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. सदर निवेदन देताना नगरसेवक सद्दाम शेरीकर, माजी नगरसेवक आलम कोरबू,विनोद मदने,अंबादास गायकवाड,असिफ सुतार,यांच्या सह नागरी आणी महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
























