सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी येथील श्री रेणूका यलम्मा देवी यात्रेत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी दादाई बहुउद्देशीय समाज सेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज जाधव यांच्या वतीने 5 हजार पाणी बाॅटल वाटप करण्यात आले.
संस्थे कडून कोन्हाळी येथे पाणीवाटप उपक्रम 2010 पासून सुरूवात करण्यात आली. ग्रामस्थांकडून युवराज जाधव यांच्या कार्याबद्दल कौतूक करण्यात आले. यावेळी कोन्हाळी ग्रामपंचायतचे सरपंच सदानंद उन्नद , सदस्य मल्लिनाथ ढेभे , रमेश बनसोडे, श्रीशैल पाटील , आकाश हुडगी, केदार बिराजदार , सचिन बनसोडे, सचिन हसापुरे आदी उपस्थित होते. यासाठी अर्यराज जाधव, श्रेयश गायकवाड, अवधूत जाधव, प्रथमेश जाधव, अलोक गायकवाड, गंगाराम गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.



























