पंढरपूर – तालुक्यातीलभटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने रोपळे (ता.पंढरपूर) येथे रामोशी समाजासाठी विविध शासकीय दाखले देण्यासाठी विशेषशिबिराचे आयोजन मंगळवारी (दि.५ मे) करण्यात आले होते. यावेळी१०४ लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
भटके विमुक्त विकास परिषदचे संघटन मंत्रीराहुल चव्हाण व प्रदेशाध्यक्ष उद्धव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबविण्यातआले. यासाठी जिल्हाधिकारी एस.कार्तिकेय, निवासी जिल्हाधिकारी अभिजीत पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे गणेश सोनटक्के, पंढरपूरचेतहसीलदार सचिन लंगोटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
दरम्यान या शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी भटके विमुक्त विकास परिषदचे जिल्हा अशासकीय सदस्य व अभियान प्रमुख सुनील पवार, पंढरपूरतालुका संयोजक प्रशांत सापनेकर, सहसहसंयोजक सुवर्णा पवार, मंडल अधिकारी बाळासाहेब कदम,तालुका पुरवठा अधिकारी श्री.बादल, आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचेअध्यक्ष अंकुश जाधव, दादा जाधव, ओंकार जाधव, परमेश्वर जाधव, विवेक जाधव आदींचे सहकार्य लाभले. या शिबिरा मध्ये सुमारे१०४ लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले काढून देण्यात आले.


























