Sunday, June 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सांगोला कृषी विभागाच्या जलतारा शोषखड्डे अभियानाला वेग

तरुण भारतbyतरुण भारत
May 7, 2026
in editor
0
सांगोला कृषी विभागाच्या जलतारा शोषखड्डे अभियानाला वेग
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला – भविष्यातील पाणीटंचाई व एल-निनोच्या संभाव्य परिणामांवर मात करण्यासाठी सांगोला तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने जलतारा शोषखड्डे अभियानाला वेग आला आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे जलसंधारणाच्या कामांना चालना मिळत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात शोषखड्डे तयार करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या शोषखड्ड्यांसाठी अनुदान दिले जात असून एका एकरासाठी एक शोषखड्डा ही अट लागू आहे.

दरम्यान, सांगोला तालुक्यातील राजुरी येथील शेतकरी पांडुरंग खुळे यांच्या शेतात प्रत्यक्ष शोषखड्ड्याचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शोषखड्डा तयार करण्याची पद्धत, तांत्रिक निकष व त्याचे फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. केवळ खड्डा खणणे नव्हे तर वैज्ञानिक पद्धतीने जलपुनर्भरण केल्यास भूजल पातळी वाढते, असे स्पष्ट करण्यात आले. जलतारा शोषखड्ड्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून विहीर व बोअरवेलची पाण्याची पातळी वाढते. परिणामी पाणीटंचाईवर मात होऊन शेती उत्पादनात वाढ होते. हवामानातील अनिश्चितता लक्षात घेता जलसंधारणाचे छोटे-मोठे उपायही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत उप कृषी अधिकारी श्रीधर शेजवळ यांनी व्यक्त केले. या प्रात्यक्षिकावेळी संतोष यजगर, पांडुरंग खुळे, सचिन खुळे, गणेश दबडे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते

साधारणतः ५ फूट लांब, ५ फूट रुंद व ६ फूट खोल अशा आकाराचे शोषखड्डे उताराच्या बाजूला किंवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी केल्यास पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरते व आसपासच्या जलस्रोतांची पातळी वाढते. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने व लोकसहभागातून जलतारा शोषखड्डे तयार करावेत. 

-बाळासाहेब सावंत, सहा.कृषी अधिकारी

Post Views: 23
Previous Post

पोलीस उपनिरीक्षक विकास मेटकरी यांचा सन्मान

Next Post

हायड्रोजन हा भविष्यातील महत्त्वाचा पर्याय : पद्मश्री यादव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
हायड्रोजन हा भविष्यातील महत्त्वाचा पर्याय : पद्मश्री यादव

हायड्रोजन हा भविष्यातील महत्त्वाचा पर्याय : पद्मश्री यादव

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा वरिष्ठ गट क्रिकेट निवड चाचणी २८ जूनला

June 21, 2026
पत्रकारिता आव्हानात्मक क्षेत्र, परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारिता आव्हानात्मक क्षेत्र, परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026

श्रीपूरचे चित्रकार चेतन भोसलें यांची भारत सरकारच्या फेलोशिप साठी निवड

June 21, 2026

बादोले बु. ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

June 21, 2026
रासायनिक प्रक्रिया करण्यावर मंदिर समिती ठाम, वारकरी संघटनेचा विरोध

रासायनिक प्रक्रिया करण्यावर मंदिर समिती ठाम, वारकरी संघटनेचा विरोध

June 21, 2026

नगरपरिषद सांगोला साजरा करणार एकल महिला दिवस

June 21, 2026
योग साधनेमुळे शरीर निरोगी बनते – मल्लिकार्जुन मसुती

योग साधनेमुळे शरीर निरोगी बनते – मल्लिकार्जुन मसुती

June 21, 2026
बार्शीत ‘चाटे शिक्षण समूहा’चा गुणवंत विद्यार्थी सत्कार व ओरिएंटेशन सोहळा उत्साहात

बार्शीत ‘चाटे शिक्षण समूहा’चा गुणवंत विद्यार्थी सत्कार व ओरिएंटेशन सोहळा उत्साहात

June 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0926235

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697