अकलूज – येथील ब्राह्मण सेवा संघ व श्री गणपती मंदिर ट्रस्ट यांचे वतीने आयोजित सामुदायिक व्रतबंध सोहळ्यामध्ये ११ बटुंवर उपनयन संस्कार करण्यात आले. अकलूज येथील कांतीलाल सांस्कृतिक भवन येथे हा शाही समारंभ पार पडला.उपनयन हा हिंदू संस्कृतीमधील सोळा संस्कारापैकी एक महत्वाचा संस्कार असून ज्ञानार्जनासाठी बटूला सज्ज करणारा संस्कार म्हणून त्याचे एक वेगळे महत्त्व आहे. समाजातील गरजूना अल्प खर्चात हा संस्कार करता यावा यासाठी ट्रस्टच्या वतीने 1983 सालापासून हा उपक्रम सुरू केला आहे दरवर्षी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये विविध भागातून समाज बांधव सहभागी होतात त्यांची राहण्याची व जेवणाची तसेच बटूंना लागणाऱ्या पूजा साहित्याची ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने सोय करण्यात येते
या कार्यक्रमात बटुंना शुभाशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहजी मोहितेपाटील, जयसिंह मोहितेपाटील,किशोरसिंह माने पाटील, सौ. शीतलदेवी मोहितेपाटील, शिवतेजसिंह मोहितेपाटील,धनंजयभाऊ देशमुख,अभय इनामदार व अकलूजमधील नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याचे पौरोहित्य दिपक शास्त्री कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हरिकाका कुलकर्णी, अवधूत शेकदार,प्रवीण इनामदार, श्रीराम महाजन,गणेश कुलकर्णी, निलेश कुलकर्णी यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण सेवा संघ व श्री गणपती मंदिर ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी व समाज बधू व भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.


























