पंढरपूर – येथील यमाई तलाव व लगत असलेली जागा गोशाळेसाठीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीली देऊ नये म्हणून पंढरपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक लक्ष्मण शिरसट, गट नेते सुजितकुमारसर्वगोड, नगरसेवक ॲड सुनिल वाळूजकर, अमोल डोके, ॲड.गुरुदास अभ्यंकर, धर्मराज घोडके, सौरभ थिटे, इब्राहिम बोहरी, मालोजी शेंबडे , गणेश शिंदे नाईक यांनी जिल्हाधिकारी एस.कार्तिकीयन यांना निवेदन दिले.
या संदर्भात माहिती देताना उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी सांगितले की, पंढरपूर शहारातील यमाई तलावा जवळील जागा श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेचाविस्तार करणेसाठी गट नं.१६१ मधील ३.१२ हेक्टर जागा देण्याबाबत महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखालीनुकतीच मंत्रालय मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये मंदिर समिती व काही महाराज मंडळी यांच्यामागणीवरून १५ दिवसाच्या आत जागा मागणी बाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा म्हणून सुचना दिलेल्या आहेत.
शासनाच्या या निर्णयाने समस्त पंढरपूरकरांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. वास्तविक पाहता यमाई तलाव हा ऐतिहासिक तलाव आहे. ही जागा नगरपरिषद मालकिची व वहीवाटीची असल्याने नगरपरिषदेच्या ताब्यात आहे.आजही या जागेची देखभाल, दुरूस्ती नगरपरिषदेच्या फंडातून केली जाते.
मध्यंतरीच्या काळात श्री विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शना सोबतच पर्यटनाचा ही आनंद मिळावा म्हणून राज्य सरोवर संवर्धन योजनेतून हा तलाव कोट्यावधी रूपये खर्च करून विकसित केला आहे. या ठिकाणी तुळशी वृंदावन सारखे अतिशय सुंदर पर्यटनस्थळ निर्माण केले आहे. तसेच याठिकाणी असणाऱ्या वॉकिंगट्रॅक वर हजारो महिला व पुरूष नागरिक सकाळ सध्यांकाळी फिरणेसाठी याचा वापर करीत आहेत.
पंढरपूर शहरामध्ये केवळ एकमेव यमाई तलावाची जागा राहिली असून ज्यावर नागरिक सुरक्षितपणे व्यायाम, फिरणे, ज्येष्ठ नागरिक विरंगुळासाठी मोठ्या प्रमाणावर यमाई तलावावर येत असतात. त्यामुळे ही जागागोशाळेसाठी देणे योग्य होणार नाही.
वास्तविक पाहता पंढरपूर नगरपरिषदेने मंदिर समितीला यापुर्वी गोशाळेसाठी ३ एकर जागा ठराव करून दिलेली आहे.मंदिर समिती मार्फत श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, संत विद्यापीठ व दर्शन मंडप याच्याउभारणीसाठी वरील जागा देऊ केली होती. सन २००९-२०१० च्या श्रीसंत तुकाराम महाराज चर्तुशताब्दीच्या आराखड्यात वरील कामाचा समावेश केला होता. सद्य परिस्थिती पाहता तेथे काही प्रमाणात गाईचे पालन केले जाते. व तेथील येणारे दुध श्रीविठ्ठलरूक्मिणीच्या पुजेसाठी पाठविले जाते. जास्त प्रमाणात दुध विक्री स्थानिक विक्रेते यांना विकले जाते. या गोशाळेवर मंदिर समितीचे कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय नियंत्रण नाही. या गोशाळेबद्दल व इथल्या गोपालनाबद्दल अनेक तक्रारी आहेत. येथील काही कर्मचाऱ्यांनी गोपालनाकडे दुर्लक्ष केल्याने अनेक गाई वासरे मरण पावले आहेत. या कारणासाठी काही कर्मचारी निलंबित सुध्दा झाले आहेत. त्यामुळे पुन्हा गोशाळेसाठी वाढिव ३ हेक्टर १२ आर जागा देणे उचीत होणार नाही.
उलटपक्षी मंदिर समितीच्या वाखरी, गोपाळपूर, देगाव व पंढरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. या जमिनी मंदिर समितीने खंडाने(भाड्याने) देऊन त्याचे भाडे मोबदला उत्पन्न मंदिर समिती घेत आहे. त्यामुळे पुर्वी नगरपरिषदेने दिलेली गोशाळेची जागा सुध्दा काढून घेवून यमाई तलावाचे सुशोभिकरणाच्या कामात वापर करावा. कारण याठिकाणीगोशाळा झाल्यास त्याचे मलमुत्र,शेणघाण तलावामध्ये जावून तलावातीलजल व वायू प्रदुषण होणार आहे.
यमाई तलाव सुशोभिकरण करणे तलावा
लगत असलेल्या जागेत ऑक्सिजन पार्क उभारणे, खुल्या जागेतव्यायाम शाळा करणे, तलावा लगत असलेल्या तुळशी वृंदावनच्या भरावाचे सुशोभिकरण करणे यासाठी १ कोटी ७१लाख रूपायाचा निधी नुकताच नगरपरिषदेला दिला आहे. या कामाच्या निविदाही प्रसिध्द झालेल्या आहेत.
तरी या सर्व बाबींचा विचार करून शासनाने श्रीविठ्ठल रूक्णिमी मंदिर समितीस गोशाळेसाठी ३ हेक्टर १२ आर जमीनदेवू नये. अन्यथा पंढरपूर शहरातील सर्वराजकीय, सामाजिक संघटना तसेच पंढरपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गट नेते सुजितकुमार सर्वगोड नगरसेवक ॲड सुनिल वाळूजकर, अमोल डोके, ॲड गुरुदासअभ्यंकर,धर्मराज घोडके,सौरभ थिटे, इब्राहिम बोहरी, मालोजी शेंबडे, गणेश शिंदे नाईक उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी स्थापन केलेल्या यमाई तलाव बचाव समितीच्या वतीने जन आंदोलन केलेजाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.


























