Saturday, June 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“पैशांचा पाऊस पाडतो” म्हणत लाखोंची फसवणूक; भोंदू महाराजांसह भावाला ठोकल्या बेड्या

तरुण भारतbyतरुण भारत
May 10, 2026
in editor
0
“पैशांचा पाऊस पाडतो” म्हणत लाखोंची फसवणूक; भोंदू महाराजांसह भावाला ठोकल्या बेड्या
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी – “आर्थिक अडचण दूर करतो, पैशांचा पाऊस पाडतो” असे आमिष दाखवत अघोरी विधीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आढेगाव येथील भोंदू महाराजासह त्याच्या भावाला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे.

याबाबत फिर्यादी निलेश बाळासाहेब भोईटे (वय 32, रा. लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीची सोशल मीडियाच्या माध्यमातून फेब्रुवारी 2024 मध्ये आरोपी नाना विरकर उर्फ गुरुमाऊली व विकास विरकर (रा. आढेगाव) यांच्याशी ओळख झाली होती. आर्थिक अडचणीत असलेल्या फिर्यादीला आरोपींनी मौजे आढेगाव येथील त्यांच्या मठात बोलावले.

तेथे महाराज उर्फ नाना गुरुमाऊली यांनी फिर्यादीचा आधार क्रमांकावरून पॅनकार्ड क्रमांक अचूक सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर “तुमची आर्थिक अडचण दूर करतो, पैशांचे मार्ग खुले करतो” असे सांगत विविध वस्तू दिल्या. मात्र कोणताही फायदा झाला नाही. उलट अघोरी विधी करण्याच्या नावाखाली वेळोवेळी मोठी रक्कम उकळण्यात आली.

यानंतर आरोपींनी फिर्यादीला “नव शिव सह्याद्री ॲग्रो फार्म लिमिटेड” या कथित कंपनीत भागीदार करतो, असे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे दिली. काही दिवसांनी संबंधित कंपनी अस्तित्वात नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने आरोपींकडे पैशांची मागणी केली असता त्याला धमकावण्यात आले.

या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 326/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 338 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्यांना प्रतिबंध अधिनियम तसेच भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परी सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांनी स्वतः तपासात सहभाग घेत दोन विशेष पथके तयार केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रात्रीत शोधमोहीम राबवत आरोपी

1. पांडुरंग उर्फ नाना उर्फ माऊली महाराज बापूराव विरकर (वय 22)

2. विकास बापूराव विरकर (वय 25, रा. विरकर वस्ती, वडोली ता. माढा)

यांना 8 मे 2026 रोजी अटक केली.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 13 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली परी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी राहुल आत्राम, पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास रणदिवे, पोलीस हवालदार संदीप गिरमकर, संतोष पाटेकर, सुरज मुलानी, संदीप साखरे यांच्या पथकाने केली.

Post Views: 50
Previous Post

वारकरी दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामाचे सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

Next Post

सरपंच स्वाती चव्हाण यांना ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्काराने गौरव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सरपंच स्वाती चव्हाण यांना ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्काराने गौरव

सरपंच स्वाती चव्हाण यांना ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्काराने गौरव

ताज्या बातम्या

नाईट लँडिंगचे कारण नको विमानसेवा सुरळीत ठेवा – जिल्हाधिकारी #viral #news #solapurnews

June 27, 2026

म्हणून उडत नाहीये सोलापूरातून विमान….. #viral #news #solapurnews

June 27, 2026

केतनचे परिवार भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला हा निर्णय

June 27, 2026

दोन उड्डाणपुलांच्या भूसंपादनाचा खर्च रु १४५ ११ कोटी #viral #news #solapurnews

June 27, 2026

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आत्मचिंतनाची गरज #news #marathinews

June 27, 2026

टी ई टी परीक्षेचा पेपर फुटला #viral #news #breakingnews

June 27, 2026

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींनी जे घडलं ते थेट सांगितले….. #viral #marathinews #news

June 27, 2026

दत्त अवतारी स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे सेवाकार्य ऐकून भारावलो – न्यायमूर्ती ए.एम.बादर

June 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0942761

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697