Friday, May 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाखरी-कोर्टी-लक्ष्मीटाकळी-अनवली-मुंढेवाडी-देगाया नवीन ४-पदरी रिंग रोडच्या डीपीआरसह निधीला तात्काळ मंजुरी

तरुण भारतbyतरुण भारत
May 15, 2026
in editor
0
वाखरी-कोर्टी-लक्ष्मीटाकळी-अनवली-मुंढेवाडी-देगाया नवीन ४-पदरी रिंग रोडच्या डीपीआरसह निधीला तात्काळ मंजुरी
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – शहरांतर्गत होणारी जड वाहतुकीची कोंडी आणि वारकरी- स्थानिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी परिचारक यांच्या निवासस्थानी भेट दिली असता, या प्रस्तावित चार पदरी बाह्यवळण रिंग रोडचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या मार्फत करण्यात यावे अशी विशेष मागणी केली. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून त्याला तात्काळ निधी मंजूर करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी केली.

वेणेगाव-पंढरपूर आणि पंढरपूर-मंगळवेढा या मार्गांवर सध्या आंतरराज्यीय जड वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. उत्तर भारताकडून अहिल्यानगर, करमाळा आणि टेंभुर्णी मार्गे येणारी मल्टी-एक्सल वाहने दक्षिण भारताकडे जाण्यासाठी पंढरपूर शहरातून प्रवास करतात. यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते अपुरे पडत असून, दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि स्थानिक वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता. मा.आ.प्रशांत परिचारक यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे वाखरी-कोर्टी-लक्ष्मीटाकळी-कासेगाव-अनवली-मुंढेवाडी ते देगाव या नवीन ४-पदरी बाह्यवळण रस्त्याची मागणी लावून धरली होती.

हा रस्ता पूर्णपणे ग्रीन फिल्ड अलायमेंटनुसार होत असल्याने शहराबाहेरून जड वाहतूक वळवणे सुलभ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार परिचारक या रिंग रोडसाठी केंद्र सरकारकडे मागणी करत होते. आज गडकरी यांच्या दौऱ्याचे औचित्य साधून त्यांनी प्रत्यक्ष निवेदन सादर केले.पंढरपूरचे भौगोलिक महत्त्व आणि वारकऱ्यांची होणारी ओढाताण लक्षात घेता, हा रस्ता पंढरपूरच्या विकासात ‘गेम चेंजर’ ठरेल, असे माजी आमदार परिचारक यांनी यावेळी पटवून दिले.

दरम्यान परिचारक यांच्या मागणीची दखल घेत नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाला या रस्त्याचा तातडीने डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या निर्णयामुळे पंढरपूर शहर खऱ्या अर्थाने वाहतूक कोंडीमुक्त होणार असून भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या महत्वपुर्ण निर्णयामुळे पंढरपूर शहरातील नागरिक व वारकरी संप्रदाय यांच्या कडून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आ.समाधान आवताडे व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 14
Previous Post

सांगोल्यात श्री शनैश्वर जयंती उत्सवाचे आयोजन

Next Post

छत्रपती संभाजी महाराज यांना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात अभिवादन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
छत्रपती संभाजी महाराज यांना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात अभिवादन

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात ८६ रक्तदात्यांचा सहभाग

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात ८६ रक्तदात्यांचा सहभाग

May 15, 2026
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम

May 15, 2026
छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

May 15, 2026
पोलिसांसाठी ‘क्रिप्टो’ तपास प्रशिक्षण; कायदा अंमलबजावणी संस्थांसोबतची भागीदारी केली अधिक दृढ

पोलिसांसाठी ‘क्रिप्टो’ तपास प्रशिक्षण; कायदा अंमलबजावणी संस्थांसोबतची भागीदारी केली अधिक दृढ

May 15, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 15, 2026
भगवंताच्या भक्तीतच सर्व सुख आणि खरं वैभव आहे – हभप राजाभाऊ महाराज रोंगे पाटील

भगवंताच्या भक्तीतच सर्व सुख आणि खरं वैभव आहे – हभप राजाभाऊ महाराज रोंगे पाटील

May 15, 2026
केंद्रीय रस्ते व वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

केंद्रीय रस्ते व वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

May 15, 2026
आझाद मैदान शिक्षा संघर्ष सांगितला स्वामी यांचे भेट

आझाद मैदान शिक्षा संघर्ष सांगितला स्वामी यांचे भेट

May 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0865089

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697