सांगोला – शनैश्वर युवक संघटना, शनिगल्ली, सांगोला यांच्यावतीने शनिवार दि.१६ मे रोजी श्री शनैश्वर जयंती उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त गुरुवार दि.१४ व शुक्रवार दि.१५ मे रोजी दुपारी ४ वा. विविध भजनी मंडळांची सेवा तसेच शनिवार दि.१६ मे रोजी सकाळी १० वा. हभप.श्रीपाद वांगीकर यांचे किर्तन, दुपारी १२ वा. पुष्पवृष्टी व त्यानंतर महाप्रसाद या कार्यक्रमाचे आयोजन श्री शनैश्वर मंदिर, शनिगल्ली, सांगोला येथे करण्यात आले आहे.
तरी सांगोला तालुक्यातील सर्व भाविक व शनैश्वर भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शनैश्वर युवक संघटनेने केले आहे.


























