Wednesday, August 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरला वैशिष्ट्यपूर्ण शाखेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

तरुण भारतbyतरुण भारत
May 15, 2026
in editor
0
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरला वैशिष्ट्यपूर्ण शाखेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे गेल्या 120 वर्षापासून कार्यरत आहे. राज्यात मोठ्याप्रमाणात साहित्य परिषदेच्या शाखा असून त्यामध्ये विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करणार्‍या शाखेला साहित्य परिषदेच्या वर्धापन दिना निमित्त पुरस्कार देण्यात येतो. त्याच अनुषंगाने यंदाच्या वर्षीचे राजन लाखे पुरस्कृत कै. बाबुराव लाखे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद वैशिष्ट्यपूर्ण शाखा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील मसाप दक्षिण शाखेला निवडण्यात आले असून दि. 26 मे रोजी या पुरस्काराचे वितरण बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे करण्यात येणार असल्याची माहिती मसाप पुणे चे अध्यक्ष योगेश सोमण, स्वाती महाळंक, प्रदीप निफाडकर यांनी जाहिर केले.त्याबाबतचे पत्र मसाप दक्षिण शाखेला प्राप्त झाले आहे.
     

मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी गेल्या 120 वर्षापासून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्यरत आहे. अनेक थोर लेखकांनी आपल्या आयुष्यातील बहुमोल वेळ देवून वाड्मय सेवकांची भूमिका पार पाडत या संस्थेला नावारूपाला आणले आहे. केवळ पुणे मर्यादा न ठेवता महाराष्ट्र साहित्य परिषदेने राज्यातील अनेक जिल्ह्यात शाखांचे जाळे पसरवले. त्यातच सोलापूरमध्ये सर्वाधिक शाखा निर्माण झाल्या. दक्षिण सोलापूर शाखेने गेल्या अनेक वर्षात शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, लोकजागृती असे विविध उपक्रम घेवून आपली वेगळी ओळख निर्माण केली. दरवर्षी दिपावलीच्या निमित्ताने पहाटेच्या प्रवचनमाला ही आगळी वेगळी संकल्पना सत्यात आणून ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांची अमृतवाणी हा कार्यक्रम अखंडपणे सुरू ठेवून यशस्वी केला. महाराष्ट्राचे प्रतिभावंत साहित्यिक कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कथा, कवितांवर आधारीत विंदा एक स्मरणसाखळी हा बहारदार कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले आणि दुबईत मसाला किंग म्हणून ओळख निर्माण करणारे धनंजय दातार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सोलापूरातील उद्योजकांना मार्गदर्शक ठरला. मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी लेखन केलेल्या तीन पुस्तकाचे प्रकाशन अगदी थाटात आणि वेगळेपणाने करण्यात आले. त्यानंतर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदिका, सुप्रसिध्द निवेदिका ज्योती आंबेकर यांचे भाषण कला शिबीर हे शिबीर, ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांचा मिश्कीली आणि कविता,  कवियत्री शांताबाई शेळके यांच्या कविता आणि गद्यलेखनावरील आधारीत असलेला अनवट शांताबाई, जगप्रसिध्द लेखक माहिती तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले यांचे ए आय ची जादू आणि उद्याचे जग या विषयावर व्याख्यान,विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्वल निकम यांची प्रकट मुलाखत तर नव वकीलांना प्रेरणादायी ठरली.इमॅजिनियस स्टुडिओ कोल्हापूर प्रस्तुत हिंदी गाण्यावर आधारीत दास्तान ए इश्क कार्यक्रम,पटकथाकार तसेच असोसिएट डायरेक्टर कुमार दवे यांचे व्याख्यान,नरहर कुरुंदकर एका विचारवंताची अपरिचित गोष्ट या साभिनय अभिवाचनाच्या नाट्यप्रयोग, भारतीय राजकारण आणि भारतीय इतिहासाची मांडणी करणारे राष्ट्रीय वक्ते पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यानाने तर गर्दीचा रेकॉर्ड कायम केला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी संघ यात्रे निमित्त संघ गंगा के तीन भगीरथ हे नाटक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सद्य परिस्थिती या विषयावर ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकर भक्त शरद पोंक्षे यांचे व्याखान, सोलापूर रंगे नेत्यांच्या संगे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून सोलापूरचे कर्तुत्ववान तीन सुपुत्र,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना एकाच मंचावर आणून एकत्रीतपणे त्यांची मुलाखत सोलापूरचे चौथे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी घेवून राजकीय प्रगल्भता कशी असते हेच दाखवून दिले, बागेश्‍वर महाराज यांचे संतसंमेलन, देशभरात गाजलेल्या विविध आर्थिक घोटाळ्यावर प्रकाश टाकण्याचे काम आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिका डॉ.अपूर्वा जोशी यांची प्रकट मुलाखत नाशिक विभाग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी घेतली,श्री सूक्त ते राष्ट्र सूक्त याविषयावर सविस्तर माहिती डॉ. रमा गोळवलकर यांनी यावेळी आपल्या व्याख्यानातून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि वि वा शिरवाडकर यांच्या जीवनावर व्याख्यानातून योगेश सोमण यांनी विस्तृतपणे माहिती दिली. कवी स्व.दत्ता हलसगीकर, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे पुस्तक प्रकाशन आणि रामदास फुटाणे यांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन,  सर्वसामान्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन तर नेहमी होते परंतु कारागृहातील बंदी असलेल्यांना काही वेळ विरंगुळा मिळावा या हेतुने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने शाखेचे उपाध्यक्ष तथा हास्यसम्राट प्रा.दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ तसेच सानिका कुलकर्णी आणि रसिका कुलकर्णी यांचे अभंगाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तत्कालीन जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या दक्षिण सोलापूर शाखेने असे विविध उपक्रमाचे आयोजन सोलापूरकरांसाठी आयोजित करण्यात आले.
    कार्यक्रमाचे नेटके नियोजन, शिस्तबध्दता, तेच तेच पणा न आणता विविधता आणून प्रत्येकवेळी नवनवीन संकल्पना राबवणे, जास्तीत जास्त आणि नवनवे प्रेक्षकांपर्यत कार्यक्रम पाहोचवणे, पारंपारिक पध्दती सोबतच आधुनिकतेचा समावेश करणे, कार्यक्रमाचे आयोजन करताना वेळेचे योग्य नियोजन आणि दिलेल्या वेळेतच कार्यक्रम सुरू करून समारोप करण्याची परंपरा, वर्षभरात राबवलेल्या कार्यक्रमाचे अवलोकन करून वेळोवेळी त्याचा हिशोब, ऑडीट आणि अहवाल तयार करून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्याकडे वेळेत पाठवणे, या सर्व महत्वाच्या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र साहित्य परिषदेने दक्षिण सोलापूर शाखेला यंदाचा कै. बाबुराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण शाखेचा पुरस्कार जाहिर करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा मंगळवार दि. 26 मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

सोलापुरकरांच्या प्रेमामुळेच हा पुरस्कार – रेणुका महागांवकर
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्यात येतात त्याला सोलापूरकर दिलखुलासपणे प्रतिसाद देतात आणि कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतात. सोलापूरकर रसिक श्रोत्यांच्या प्रेमामुळे साहित्य परिषदेने दखल घेवून दक्षिण सोलापूर शाखेला वैशिष्ट्यपूर्ण शाखा म्हणून पुरस्कार जाहिर केला. यामुळे आणखी नवनवीन कार्यक्रम घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. अशी प्रतिक्रिया मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी व्यक्त केली

Post Views: 50
Previous Post

सांगोला महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

Next Post

आझाद मैदान शिक्षा संघर्ष सांगितला स्वामी यांचे भेट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आझाद मैदान शिक्षा संघर्ष सांगितला स्वामी यांचे भेट

आझाद मैदान शिक्षा संघर्ष सांगितला स्वामी यांचे भेट

ताज्या बातम्या

मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवानिमित्त ‘गर्भसंस्कार’, सरकारी योजनांची देणार माहिती

मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवानिमित्त ‘गर्भसंस्कार’, सरकारी योजनांची देणार माहिती

August 19, 2026
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० कालबद्ध पदोन्नती योजना लागू करा

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० कालबद्ध पदोन्नती योजना लागू करा

August 19, 2026
संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा

संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा

August 19, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा; लेबर फेडरेशनची मागणी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा; लेबर फेडरेशनची मागणी

August 19, 2026

एमपीएससीच्या भरतीत स्पर्धेचा उच्चांक; ५,७०७ जागांसाठी तब्बल १२.६३ लाख अर्ज

August 19, 2026
युवा शक्ती व्यसनमुक्त भारतासाठी : MIT कनिष्ठ महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

युवा शक्ती व्यसनमुक्त भारतासाठी : MIT कनिष्ठ महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

August 19, 2026
अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 19, 2026
डॉ श्रेया कुलकर्णी  ऑथोपिडीक फिजीओथेरपी या परिक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण

डॉ श्रेया कुलकर्णी ऑथोपिडीक फिजीओथेरपी या परिक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण

August 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1087840

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!