अक्कलकोट – केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध रस्ते विकास दुधनी रेल्वे गेट येथे उड्डान पुल बोरी नदीवरील पुल ‘ ‘ वागदरी अक्कलकोट तोळणुर रसत्याचे दुहेरीकरण , मोहोळ बसवनगर वळसंग रस्त्याचो दुपदरीकरण आदि विकास कामाचे भूमिपुजन सभारंभ प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गाणगापुर रस्ता खराब झाल्याची व्यथा मांडली गाणगापुर रस्ता नव्या ने नुतनीकरणाची तसेच वळसंग तांदुळवाडी रस्ता हैद्राबाद महामर्गाला जोडण्यात यावा व सोलापुर मधील वाहतुक कोंडी समस्या मिटविण्यासाठी नवा रिंगरोड रस्त्याची मागणी केंद्रीम रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली .
या तीनही मागण्या तात्काळ मान्यता देण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ दिली .याबाबत तात्काळ आदेश पारित करण्याची ग्वाही दिली . यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विविध विकास कामे भूमिपुजन दौरा अक्कलकोट विधान सभा मतदार संघासह सोलापुर जिल्हा वासीयांसाठी मोठा फलदायी ठरला आहे . यामुळे अक्कलकोटवासीयासह जिल्ह्यातील तमाम जनतेमधुन मोठा आनंद व्यक्त केला जात आहे .
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचे अक्कलकोट साठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल तालुका वासीयांच्या वतीनं कृतज्ञापूर्वक मोठे आभार व्यक्त करताना गौरवोदगार काढले . आमच्या मागण्या पेक्षाही जास्त भरभरून दिले . सोलापुर ला जाण्यासाठी तासापेक्षा अधिक काळ लागायचा आता तुम्ही वीस मिनीटात पोहचु शकता . अक्कलकोट तीर्थक्षेत्री येणाऱ्या भादिक पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली .हॉटेलं लॉज भक्त निवास रिसॉर्ट व्यवसाय वाढीस लागले अनेकाना रोजगार मिळाला सोलापुर चा शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली .
इंधनाची वेळेची मोठी बचत झाली . अक्कलकोट च्या विकासासाठी मोठी चालना मिळाली . ‘ असे सांगत असतानाच आ सचिन कल्याणशेट्टी यांनी गागणापूर रस्ता खराब झाल्याची व्यथा मांडून नव्याने रस्ता नुतनीकरणाची मागणी व्यक्त केली . वळसंग तांदुळवाडी रस्ता हैद्राबाद महामार्गाला जोडावे . सोलापुर शहरातील वाहतुकी वरील ताण कमी होण्यासाठी नव्याने सोलापुर साठी रिंग रोड करण्याची आग्रही विनंतीपूर्वक मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे केली . अंत्यत स्पष्ठ वक्ते असलैले केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मागणी केलेल्या मागण्या तात्काळ मंजुरीचे आदेश काढण्याची ग्वाही सभा स्थानी तात्काळ दिली . यामुळे अक्कलकोट विधान सभा मतदार संघातील जनतेसह सोलापुर जिल्हावाशीयातुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक व आभार व्यक्त करून आनंद व्यक्त केला जात आहे .

























