सोलापूर – केंद्रीय रस्ते व वाहतूक महामंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांचा लोकप्रिय खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी व त्यांच्या शिष्टमंडळाने हॉटेल बालाजी सरोवर येथे श्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मोहोळ ते वळसंग या रस्त्याच्या कामासाठी 740 कोटी रुपये कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता व पक्षपात न करता मंजूर करून दिल्याबद्दल श्री नितीन गडकरी साहेबांचा शाल सिद्धरामेश्वरांची मूर्ती पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष जहांगीर शेख. ओबीसी विभागाचे बाळ दळवी. हनुमंतराव पाटील. माजी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता शिवानंद बिराजदार .अमोघ सिद्ध पुजारी.प्रकाश फुलारी. आधीसह शिष्टमंडळाने भेट घेऊन आभार व्यक्त केले.

























