अक्कलकोट : गोवा येथे लायन्स क्लब गोवा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागाच्या लायन्सची आयोजित परिषद मोठ्या उत्साहात कलीगुड येथे संपन्न झाली. या परिषदेमध्ये विविध जिल्ह्यातून आलेल्या क्लबच्या सादरीकरणामध्ये अक्कलकोट लायन्स क्लबने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले अन्नछत्र मंडळाच्या पालखी परिक्रमा व कायॅ या सोहळ्याच्या माध्यमातून प्रकटीकरण करण्यात आले. हे पाहण्यासाठी गोव्यातील स्वामी भक्तांनी दुतर्फा गर्दी केलेली होती. अक्कलकोट लायन्स क्लबने सादरीकरणामध्ये प्रथम क्रमांक पटकाविले आहे. अध्यक्षस्थांनी प्रांतपाल डाॅ.विरेंद्र चितले हे होते.
अक्कलकोट लायन्स क्लबच्या पदाधिकारी हे महाराष्ट्रीयन पेहराव्याने लक्षवेधी ठरले आहे. या बरोबरच भजनी मंडळ श्री स्वामी समर्थांच्या रूपा मध्ये असलेली व्यक्तीने गोवेकरांना स्वामी रुपामध्ये गोवेकरांना दर्शन दिले. संपूर्ण परिसर हा भक्तिमय झालेला होता. या अक्कलकोट लायन्स क्लबच्या विविध उत्कृष्ट कार्यामुळे पाच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामुळे अक्कलकोट लायन्स क्लबला मिळालेल्या पुरस्काराने गोवा येथील कार्यक्रमात मानाचा तुरा खवण्यात आला आहे.
दरम्यान क्लबची प्रांत पाल निवडणूक संपन्न झाली. या मध्ये ला. मंगेश दोशी- फलटण हे द्वितीय प्रांतपाल म्हणून ४७ मतांच्या फरकाने विजयी झाले. उपप्रांतपाल म्हणून गडहिंग्लज चे डॉ. किरण खेराटे तर सन २०२६-२०२७ प्रांत पाल म्हणून सोलापूरचे उद्योजक राजेंद्र शहा- कासवा यांची निवड करण्यात आली आहे. या नूतन पदाधिकाऱ्यांचे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व त्यांचे पुत्र न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी अभिनंदन करून कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी गोवा येथील श्रीमती अनिता कलंगुड, गोविंदा कलंगुड, शाहू पाटील, रघुनाथ पाटील, रमेश राठोड, गोव्यातील सर्व भजनी मंडळासह अक्कलकोट लायन्स कल्बचे अध्यक्ष व श्री स्वामी समर्थ मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, राजेंद्र हत्ते, प्रभाकर मजगे, शहीद वळसंगकर, मल्लिनाथ साखरे, राजशेखर कापसे, शिरीष पंडित, विठ्ठलराव तेली, मल्लिकार्जुन मसुती, सुभाष गडसिंग, कल्याणी आळगी, शिवशरण खुबा, सुधीर माळशेट्टी, कमल आळ्ळोळी, महिबूब सलगरकर, राजू विभूते, राहुल आळंद, अमोल आहेरकर आदिजन उपस्थित होते.
























