अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून आधुनिक पायाभूत सुविधांनी पर्यटनाला एक नवी दिशा दिली आहे. नव्याने होणारे महाप्रसादालय श्री क्षेत्र अक्कलकोटच्या विकासात भर टाकणारे असल्याचे मनोगत पुणे गृहनिर्माण मंडळ (म्हाडा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हाडा सोलापूर व पुण्याचे हरिदास देशमुख, सुमित उबाळे आदिजन उपस्थित होते.
याप्रसंगी मनोज निकम, प्रवीण देशमुख, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
























