माळशिरस : येथील ग्रामदैवत श्री रामदेव व श्री मारुती देव देवस्थान च्या वतीने श्री रामदेव व मारुती देव मंदिरात संगीतमय श्री रामायण कथा सप्ताह चे सोमवार दिनांक १८ मे ते सोमवार दिनांक २५ मे पर्यंत आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचे कथा प्रवक्ते श्री ह भ प गुरुवर्य कैवल्य महाराज चातुर्मास्ये सदगुरु दादा महाराज संस्थान अनवा व पंढरपूर हे करणार
असून कथेची वेळ रोज दुपारी चार ते सात वाजेपर्यंत असल्याचे मंदिर समितीचे चेअरमन ऍड मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले
या संगीतमय रामायण कथा सप्ताह मध्ये रोज रामायण कथा बरोबरच मंगळवार दिनांक १९ मे रोजी श्री राम जन्म कथा व उत्सव बुधवार दिनांक बुधवार दिनांक २० मे रोजी श्रीराम जानकी विवाह सोहळा व महाप्रसाद रविवार दिनांक २४ मे रोजी ग्रंथासह नगर प्रदक्षिणा सायंकाळी सहा वाजता सोमवार दिनांक २५ मे रोजी काल्याचे किर्तन सकाळी दहा ते बारा व दुपारी एक वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा ग्रामस्थांनी व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे


























