सिद्धेश्वर तलावात बुडून वृद्धाचा मृत्यू
सोलापूर – सिद्धेश्वर मंदिर येथील तलावात रविवारी सायंकाळी सात वाजता एका 77 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह मिळून आला.
जीतदास गुलाबदास पांगळ ( वय 77 वर्ष राहणार वसंत विहार सोलापूर ) असे त्या मयत व्यक्तीचे नाव आहे . रविवारी सायंकाळी मंदिर परिसरातील तलावात पाण्यावर तरंगताना संबंधित व्यक्तीचा मृतदेह तेथील लोकांना आढळून आला .ही खबर फौजदार चावडी पोलिसांना समजले असता पोलीस हवालदार कटारे यांनी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात रात्री आठ वाजता दाखल केला .
धावती दुचाकी समोरील दुचाकीला धडकली – वळसंग जवळ एक जण जागीच ठार
सोलापूर – भर धाव वेगातील दुचाकी समोरील विचार केला जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात जागीच ठार झाल्याची घटना सोलापूर अक्कलकोट मार्गावर वळसंग वाडा हॉटेल समोर रविवारी रात्री नऊ वाजता घडली .
रोहित कृष्णात जाधव ( वय 35 वर्ष , रा . दहीटणेवाडी ,ता. अक्कलकोट )असे त्या मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे . वरील दुचाकी स्वार हा रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सोलापूर कडून अक्कलकोट कडे भर वेगात निघाला असताना वाटेत वळसंग वाडा हॉटेल समोर त्याची दुचाकी समोरील दुचाकीला पाठीमागून जोरात धडकली . यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला . तर समोरील दुचाकीस्वारा सह दोघेजण किरकोळ जखमी झाले . सदरचा मृतदेह एका रुग्णवाहिकेतून येथील शासकीय रुग्णालयात रात्री साडेनऊ वाजता दाखल करण्यात आला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले . दरम्यान अपघात ग्रस्त दुचाकी आणि इतर साहित्य व संघ पोलीस ठाण्यात जमा केल्याची माहिती ॲम्बुलन्स वाल्याने दिली .
Post Views: 136