सोलापूर : सार्वजनिक वापराच्या वर्दळ असणाऱ्या खाजगी इमारती, आस्थापना, संस्था.आदींनी आग प्रतिबंधक उपाय योजना तसेच अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (फायर सेफ्टी ऑडीट) आदी नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व मंगल कार्यालये, सार्वजनिक वापराच्या वर्दळ असणाऱ्या खाजगी इमारती, प्रायव्हेट शाळा कॉलेज, कोचिंग सेंटर, नर्सिंग होम, हॉस्पिटल, सिनेमा हॉल्स, पेट्रोल-डिझेल/इंधन पंप, गॅस गोडावून, बँक, शासकीय / निमशासकीय/सार्वजनिक उपक्रमांची कार्यालय, मोठी/लहान व्यावसायिक कार्यालय, व्यापारी संकुले, रेस्टॉरंट व हॉटेल्स, बार एन्ड रेस्टॉरंट इत्यादी सर्व प्रकारच्या व्यावसायिक मालमत्ता धारकांना याद्वारे निर्देशित करण्यात येते की, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ (सुधारित अधिनियन २०२३) चे कलम ३ (१) अन्वये ‘इमारत अथवा तिच्या भागामध्ये आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजनांची तरतूद करणे, संबंधित स्थानिक प्राधिकरणाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याकडून आवश्यक असलेली तात्पुरती आग संरक्षण मान्यता किंवा अंतिम आग संरक्षण मान्यता किंवा यथा स्थिती, आग संरक्षण नूतनीकरण करणे तसेच अग्निशमन साहित्य व उपकरणे नेहमी दुरुस्त आणि कार्यक्षम ठेवणे हे मालक व भोगवटधारक यांची जबाबदारी आहे. तसेच कलम ३(३) नुसार मालक व भोगवटधारक यांना लायसन्सप्राप्त अभिकरणाकडून आग प्रतिबंधक उपायोजना पुरेशा प्रमाणात व वेळोवेळी अशी उपाययोजना प्रभावीरित्या कार्यक्षम आहे याची खात्री करून दर सहा महिन्यातून (जानेवारी व जुलै) वर्षातून दोन वेळा आग परिक्षण (Fire Audit) वर्षातून करून घेणे व आग परिक्षणातील नमुद त्रुट्यांचे निराकरण करणे कायदेशीर बंधनकारक आहे.
हे लक्षात घेता महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व व्यावसायिकांनी महाराष्ट्र शासनाचे संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा, मुंबई यांनी निश्चित केलेल्या संस्था / अभिकर्ता / लायसन्सिंग एजन्सीद्वारे आपल्या व्यवसायिक /प्रतिष्ठान / क्षेत्राची आग प्रतिबंधक उपाययोजना करणे व यापूर्वी उपाययोजना करून घेतल्यास त्यातील त्रुटी विश्लेषण करून त्यात सुधारणा करणे, उपाययोजना प्रभावीरीत्या कार्यक्षम असण्याकरिता अद्यावत करणे इत्यादी बाबीसाठी लायसन्सिंग एजन्सीकडून पूर्तता करून घ्यावी व त्यांच्या इमारत अथवा तिच्या भागामध्ये आग परिक्षण (Fire Audit) करून हीच अंतिम नोटीस समजून अहवाल सोलापूर महानगरपालिका अग्रिशमन विभागात सादर करावे व ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे
नियमांचे पालन न केल्यास होणार फौजदारी कारवाई
आग प्रतिबंधक उपाययोजना न करणे, इमारतीचे आग परिक्षण न करणे अथवा अग्रिशमन साहित्य व उपकरणे न बसविणे अथवा अग्निशमन साहित्य व उपकरणे नेहमी दुरुस्त आणि कार्यक्षम न ठेवत व्यवसाय करीत असल्यास व अपघाताने आग लागून जागेचे, प्रतिष्ठानाचे, तेथे वावरणाऱ्या मनुष्यबळाचे, त्यात येणारे जाणारे करीत असलेल्या सर्वसाधारण नागरिकांना जिवित, वित्तीय व इतर प्रकारचे हानी झाल्यास व्यवसाय करणाऱ्यास जबाबदार ठरविण्यात येईल व उक्त अधिनियम २००६ चे कलम ३६ व ३८ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Post Views: 13