Wednesday, May 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा

तरुण भारतbyतरुण भारत
May 20, 2026
in west maharashtra
0
अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
जालना : महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याची तेजस्वी परंपरा जपणाऱ्या रणरागिणी मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी आणि छत्रपती शंभूराजे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या सातारा जिल्ह्यातील माहुली संगम येथील समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. तब्बल ७० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या पवित्र स्थळाच्या विकासासाठी १३३ कोटी रुपयांच्या भव्य स्मारकास मंजुरी देण्यात आल्याची माहिती शिवसेना सचिव तथा सहमुख्य संपर्क प्रमुख (मराठवाडा) डॉ. संजय लाखेपाटील यांनी दिली.
मागील महिन्यात ३ एप्रिल रोजी शिवसेना सचिव डॉ. संजय लाखेपाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख तथा नवी मुंबईचे नगरसेवक अंकुश बाबा कदम, रघुनाथ चित्रे, प्राचार्य मोरे सर, करण गायकर, राहुल गावडे आणि शरद देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ संभाजी शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी माहुली संगम येथील समाधीस्थळाची दुरवस्था छायाचित्रे व व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा आणि मोगल बादशहा औरंगजेबाला दक्षिणेत रोखून धरणाऱ्या रणरागिणी ताराराणी तसेच दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवणारे थोरले शाहू महाराज यांच्या कार्याला साजेसे प्रेरणादायी स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांना स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत या भव्य स्मारकासाठी १३३ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. या निर्णयाबद्दल डॉ. संजय लाखेपाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पर्यटन मंत्री तथा सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांचे आभार मानले. हे स्मारक केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून, मराठ्यांच्या पराक्रमाचा, स्वराज्याच्या संघर्षाचा आणि हिंदवी साम्राज्याच्या तेजस्वी इतिहासाचा प्रेरणादायी वारसा जतन करणारे केंद्र ठरेल, अशी भावना डॉ. लाखेपाटील यांनी व्यक्त केली.
Post Views: 6
Previous Post

मनाची प्रसन्नता ही यशाची गुरुकिल्ली – डॉ. संजय उपाध्ये 

Next Post

अग्नीसुरक्षा उपाययोजना, फायर ऑडिटसंदर्भातील नियमांचे पालन करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अग्नीसुरक्षा उपाययोजना, फायर ऑडिटसंदर्भातील नियमांचे पालन करा

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या ३० मे पासून सुरू होणाऱ्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जाणार

May 20, 2026
स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या ‘त्या’ समाजसेवकाचा अनोखा सत्कार!

May 20, 2026

शक्तीपीठ महामार्ग वेळापूर येथे समर्थनार्थ शेतकरी मेळावा

May 20, 2026

अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू; २१ मेपर्यंत पसंतीक्रम भरण्याची अंतिम मुदत

May 20, 2026

तीन महिन्यांपासून वेतन रखडले; दिव्यांग शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आक्रोश

May 20, 2026

वृद्ध इसमाचा मृत्यू  – मजुराची गळफासाने आत्महत्या – औषध पिलेल्या इसमाचा मृत्यू

May 20, 2026

पाहणी पूर्ण, आता गुणांकनाची कसोटी; ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये गावागावात उत्सुकता

May 20, 2026

अक्कलकोट तालुक्यात रानडुकराचा हैदोस – हल्ल्यात तीन शेतकरी जखमी 

May 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0872798

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697