पंढरपूर – येथील चित्रकारसौरभ सदानंद डिंगरे यांने रेखाटलेले चित्र थेट फ्रान्समधीलकान्स चित्रपट महोत्सवात झळकले आहे. त्यामुळेपंढरपूरकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. सौरभ डिंगरे हा आपली चित्रे”मदालसा बाय सौरभ” या नावाने प्रसिद्ध करतो.कान्स
मध्ये सध्या चित्रपट महोत्सव सुरु आहे. या कान्स मधील चित्रपट महोत्सवात रेडकरपेटवर ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफहे अवतरले होते. यामध्ये निवेदिता सराफ यांनी मराठमोळीसाडी परिधान करून ग्रँड एंट्री घेतली. यावेळी निवेदिता सराफ यांच्या ब्लाऊच्या पाठीमागील बाजूस माय मराठी भाषे विषयी अभिमानास्पदअसा मराठी नावाचा फलक (पाटी) हाती घेतलेल्या आणि विशेष म्हणजे पोलके, नऊवारीसाडी तसेच नाकात नथ असा अस्सल मराठमोळा
पोशाखातील मदालसा या चित्र प्रकारातील तीन चिमुकल्या लहानमुलींचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हेच सुंदरचित्र येथील चित्रकार सौरभ डिंगरे याने रेखाटलेले आहे. त्यामुळे या चित्रांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. या चर्चेवेळी आपसुकच पंढरपूरचा देखील नामोल्लेख होत आहे. सौरभच्या या चित्रांमुळे पंढरपूरच्या नावलौकीकात एक प्रकारे भरच पडली आहे.
सौरभ डिंगरे हा आपली चित्रे”मदालसा बाय सौरभ” या नावाने प्रसिद्ध करतो. अनेक हिंदीमराठी कलाकार , उद्योगपती यांच्याकडे त्याची चित्रे आहेत. मुंबई, पुणे, बेंगलोर, गोवा, कोलकत्ता अशा मोठ्या शहरातही त्याच्या चित्रांची प्रदर्शने कायम भरवली जातात. कान्स महोत्सवा मधील चित्रामुळे त्यांच्या स्वत:च्यानावा बरोबरच सहाजिकच पंढरपूरच्या नावलौकीकात देखील भर पडली आहे.
————–
चौकट : ( कलाप्रेमी नागरिकांमधून कौतूकाचा वर्षाव )
कान्स चित्रपट महोत्सवासाठी त्याने रेखाटलेले मराठमोळ्या लहान मुलींचे चित्र आणि त्यातून मराठी संस्कृतीची झळकलेली अस्मिता ही सौरभच्या कलेबाबत फ्रान्समध्ये डंका वाजवून गेली.यानिमित्ताने सौरभच्या कल्पकतेचे आणि सुर्जनशीलतेचे करावे तेवढे कौतुक थोडेच असल्याच्या प्रतिक्रिया तमाम पंढरपूरकर कलाप्रेमी नागरिकांमधून उमटत आहेत.
Post Views: 16