Monday, July 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बालाजी अमाईन्सचा देशातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प सुरू

तरुण भारतbyतरुण भारत
May 21, 2026
in solapur
0
बालाजी अमाईन्सचा देशातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प सुरू
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी येथे बालाजी अमाईन्स कंपनीने देशातील पहिला डायमिथाईल इथर (DME) उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केला असून २० मे पासून व्यावसायिक उत्पादनास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          डीएमईचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे. डीएमई हे एलपीजीमध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ आणि कार्यक्षम पर्यायी इंधन मानले जाते. युरोप आणि पाश्चिमात्य देशांमध्ये एलपीजीमध्ये २० टक्क्यांपर्यंत डीएमईचे मिश्रण करून वापर केले जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे वार्षिक १ लाख मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला असून डीएमई उत्पादनासाठी आवश्यक मूलभूत अभियांत्रिकी तंत्रज्ञान परदेशी कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे.
        व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले की, हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. भारतात डीएमई उत्पादन पूर्णपणे नवीन असल्याने बीआयएसने नुकताच नवीन आयएस कोड जाहीर केला असून त्यानुसार एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत डीएमई मिश्रणास मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आता डीएमई मिश्रण प्रकल्पांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
         जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता पर्यायी इंधनांचा विकास अत्यावश्यक बनला असून डीएमईच्या वापरामुळे भारताचे एलपीजी आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतामधील हा पहिलाच डीएमई उत्पादन प्रकल्प असल्याने उत्पादन साठवण, वाहतूक, हाताळणी आणि रोड टँकर परिवहन यांसाठी आवश्यक भारतीय मानकांचा अभाव असल्यामुळे PESO परवानग्या आणि इतर वैधानिक मंजुरी मिळविताना कंपनीला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी कंपनी एरोसोल उद्योग आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांसाठी हीटिंग इंधन म्हणून डीएमईचा पुरवठा करणार आहे.
या उद्घाटन समारंभास पूर्णवेळ संचालक एन. राजेश्वर रेड्डी, वरिष्ठ महाव्यवस्थापक गोविंद मेंचेकरे तसेच महाव्यवस्थापक विनय दुर्गम उपस्थित होते.
ईव्ही बॅटरी केमिकल्स क्षेत्रातही मोठा विस्तार
 कंपनीच्या भविष्यातील धोरणाविषयी माहिती देताना डी. राम रेड्डी यांनी सांगितले की, ईव्ही बॅटरी केमिकल्स क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी वेगाने विस्तार करत आहे. भविष्यात काही विद्यमान प्रकल्पांचे पुनर्रचना करून नव्या पिढीतील ईव्ही बॅटरी केमिकल्स उत्पादनासाठी त्यांचा वापर करण्यात येणार आहे.
डीएमसी आणि एनएमपी उत्पादनातही आघाडी
ईव्ही बॅटरी इलेक्ट्रोलाइट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या या
डायमिथाईल कार्बोनेट (DMC) रसायनाचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी आहे. कंपनीकडे सध्या वार्षिक १५ हजार मेट्रिक टन उत्पादन क्षमता उपलब्ध आहे.
एन-मिथाईल पायरोलिडोन (NMP) :
गेल्या दोन दशकांपासून कंपनी एनएमपीचे उत्पादन करत असून आता ईव्ही बॅटरी ग्रेड सॉल्व्हेंटही विकसित करण्यात आले आहेत. देशभर उभारल्या जाणाऱ्या गिगा वॅट क्षमतेच्या ईव्ही बॅटरी प्रकल्पांना पुरवठा करण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे. डीएमसी आणि एनएमपी या दोन्ही रसायनांचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही देशातील एकमेव कंपनी असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
Post Views: 80
Previous Post

पंढरपूरात ५, १० आणि २० रुपयांची नाणी आणि १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा

Next Post

एम.पी.एस.सी. मोठा निर्णय; टायपिंग टेस्ट रद्द, गुणवत्तेच्या जोरावरच मिळणार सरकारी नोकरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एम.पी.एस.सी. मोठा निर्णय; टायपिंग टेस्ट रद्द, गुणवत्तेच्या जोरावरच मिळणार सरकारी नोकरी

ताज्या बातम्या

सायकलच्या धक्क्यावरून वाद; उजनीत मध्यस्थी करणाऱ्या चुलत्याचा दगड मारून खून

July 5, 2026
खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

July 5, 2026
विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

July 5, 2026

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

July 5, 2026

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळविली – अहमद नगरच्या तरुणावर सोलापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

July 5, 2026
पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

July 5, 2026

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

July 5, 2026
मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

July 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0960831

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!