सोलापूर – सोलापूरचे नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांनी मंगळवार, 19 मे रोजी आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. जिल्हा क्रीडा कार्यालयात पार पडलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी ही सूत्रे हाती घेतली.
याप्रसंगी माजी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी श्री. मोहारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा कार्यभार अधिकृतपणे त्यांच्याकडे सोपवला. यावेळी श्री. हरनाळे यांनी मोहारे यांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या, तर नूतन क्रीडा अधिकारी मोहारे यांनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा मानस व्यक्त केला. याप्रसंगी मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड, माजी तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, तालुका क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, वरिष्ठ लिपिक श्री. वालवडकर आदी उपस्थित होते.
शारीरिक शिक्षण शिक्षक, कराटे व किकबॉक्सिंगच्या वतीने स्वागत
श्री. मोहारे यांचे शहर, जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने दशरथ गुरव यांनी स्वागत केले. तसेच सोलापूर जिल्हा कराटे व किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने भीमराव बाळगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इक्बाल शेख, धनंजय धेंडे, मनोज बाळगे उपस्थित होते. श्री. मोहारे यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध खेळाच्या खेळाडूंच्या सरावासाठी चांगले मैदान उपलब्ध करून देणे तसेच क्रीडा संघटना व खेळाडूंच्या हितासाठी काम करणार असल्याचे सांगितले शालेय व संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त खेळाडू राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होऊन सोलापूर जिल्ह्याचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















