बहिणीचे फोटो फेसबुक टाकल्याचा जाब विचारल्याने तलवार व लाथाबुक्याने मारहाण – भाऊ जखमी
सोलापूर – बहिणीचे फोटो फेसबुकवर का टाकला म्हणून विचारणाऱ्या एका भावाला तलवार व लाथाबुक्याने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव येथील नदी बाजूला आज गुरुवारी दुपारी दोन वाजता घडली .
रिजवान जमीर शेख (वय 23 वर्ष ,रा . इंडी , जिल्हा विजयपूर ) असे त्या मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे . बहिणीचे फोटो फेसबुकवर टाकल्याचा जाब विचारला म्हणून रागामध्ये सिद्धू गायकवाड व इतर चार जणांनी मिळून त्याला तलवार व लाथाबुक्याने मारहाण केली . यात डोक्याला जखम व सर्व अंगाला मुकामार लागल्याने त्याला मंद्रूपच्या आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात मित्र सोहेल शेख याने सायंकाळी दाखल केले .
कामाचे पैसे देतो म्हणून घरी बोलावून एकाला लोखंडी पाईप ने मारहाण
सोलापूर – कामाचे पैसे देतो म्हणून घरी बोलावून एका इसमाला लोखंडी पाईप ने मारहाण करण्यात आलेली घटना मोहोळ तालुक्यातील मोठी कामती येथे मंगळवारी रात्री घडली .
शिवाजी रामलिंग तानोडे (वय 40 वर्ष , वाघोली , ता मोहोळ ) असे त्या मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला 19 मे रोजी रात्री आठ वाजता मोठी कामती येथील विकी बाबरे यांच्या घरी बोलावून घेऊन पगार मागितली म्हणून त्याला अशोक बाबरे ,विकी बाबरे या दोघांनी मिळून लोखंडी पाईपने मारहाण केली . यात सर्व अंगाला मुकामार लागल्याने तो उपचाराकरता येथील शासकीय सायंकाळी स्वतः दाखल झाला .
Post Views: 16