पिलीव – प्रत्येक तिन वर्षानी अधिक मास म्हणजेच धोंडयाचा महीना येतो.यंदा हा धोंडयाचा महीना 17 मे पासुन सुरु झाला असुन तो 15 जूनला संपणार आहे.या अधिक मासात म्हणजेच धोंड्या महीन्यात जावयाला सासुरवाडीला बोलावुन सोन्या _ चांदीचा धोंडा किंवा दागिने ,नवीन कपडे ,भेटवस्तू देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे .यंदा सोन्या _ चांदीचे दर अक्षरश गगनाला भिडले आहेत.यामुळे जावयाला यंदा काय भेट द्यायची ही चिंता सासरकडील मंडळीना सतावत आहे .प्रचंड आर्थिक जुळवाजुळव करावी लागणार आहे .आर्थिक फरफट झाली तरीही जावयाला नाराज करणे परवडणार नाही अशी अवस्था झाली आहे .जावयाबरोबरच लेकीला सुद्धा नवीन साडी किंवा भेटवस्तू घ्यावी लागणार आहे .तसेच जावयाला घरी आल्यानंतर चांगले चविष्ट, आवडीचे जेवण करावे लागणार आहे .यात यंदा गॅस, खाद्यतेल, किराणा याच्या दरात चांगलीच वाढ झाल्यामुळे ,धोंडयाचा मान जावयाला नाराज न करता कसा सांभाळायचा हा प्रश्न सासरकडील मंडळीपुढे सध्या उभा आहे .यामध्ये लेक नाराज होणार नाही पण जावयाला नाराज करुन चालणारच नाही या विवंचनेत सध्या सासरकडील मंडळी आहेत.सध्या सराफ दुकानात महागाईमुळे धोंड्या महीन्यात फारशी गर्दी अजिबात अद्यापपर्यंत दिसुन येत नाही .जावयाला यंदा थोडक्यात खुष करण्याचा प्लॅन आहे .भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने _ चांदी खरेदी करु नये या आवाहनाला किती जावई प्रतिसाद देतात यामुळे सासरकडील मंडळीवर येणारा आर्थिक ताण कमी होईल. अधिक मासाचे धार्मिक महत्व? अधिक मासात भगवान विष्णूची उपासना केली जाते.तसेच दानधर्म, उपवास, धार्मिक ग्रंथाचे वाचन, केले जाते .या महीन्यात जावयाला घरी बोलावुन आदरातिथ्य करण्याची प्रथा आहे .यालाच गेल्या अनेक वर्षांपासून धोंडयाचा मान असे म्हटले जाते.या महीन्यात घरातील महीला देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी जातात. धोंडयाचा मानासाठी जावयांना सासुरवाडीला बोलावण्याची पद्धत _. या महीन्यात जावयांना व मुलींना घरी बोलावुन सोन्या _ चांदीचा धोंडक,अंगठी, चैन ,नवीन कपडे ,भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. यंदा महागाईमुळे सोन्याचे सोडा ,चांदीच्या धोंडयाचेही मोठे वांदे __यंदा सोने प्रती ग्रॅम एक लाख पंचेचाळीस हजार रुपये आहे .तर चांदीचे दरही गगनाला भिडले आहेत यामुळे सासरकडील मंडळीची जावई बापुला खुष करताना मोठी आर्थिक ताणाताण होणार आहे.यामध्ये जावई बापुने समजावून घेतले तर बरे नाहीतर सासरकडील मंडळीचे धोंड्या महीन्यात जावई बापुचे मानपान करताना दमछाक झाल्याशिवाय राहणार नाही .पण आपली मुलगी सुखात राहावी जावई बापुने तिचा सांभाळ करावा यासाठी महागाईचे सावट असेना पण धोंड्या महीन्यात जावई बापुला खुष करावेच लागेल.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















