ढरपूर – अधिक मासा निमित्त दररोज वाढणारी गर्दी पाहता येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सध्या अँक्श्नमोडवर आली आहे. कारण विना परवाना दर्शनास प्रवेश दिल्याप्रकरणी मंदिर समितीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अन्य दोन कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात आली आहे.
मागील एक वर्ष कालावधीत विनापरवाना दर्शनास भाविकांना प्रवेश देणे तसेच दर्शन रांगेत घुसखोरी करणे या प्रकारांना आळा घालण्यासाठी मंदिर समितीने कठोर भूमिका घेतली आहे. आतापर्यंत विनापरवाना दर्शनास प्रवेश दिल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यां विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन कर्मचाऱ्यां विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.या बरोबरच दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्या सुमारे ३ ते ५ व्यक्तींवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दर्शन रांगेत घुसखोरी करणे, विनापरवानादर्शनासाठी भाविकांना थेट प्रवेश देणे अथवा दर्शन व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारेहस्तक्षेप करणे या बाबी मंदिर समितीने अत्यंत गांभीर्याने घेतल्या असून अशाप्रकारांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे मंदिर समितीचे धोरण असल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारीअधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
Post Views: 7