
पंढरपूर – येथील उपविभागीय पोलिस अधिकारीप्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.२५) पोलिस हवालदार रोंगे, पोलिस हवालदार हेंबाडे, पोलिस काँन्स्टेबल हुलजंती व पोलीस नाईक शिंदे यांनी गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आंबे येथील नदीकाठ परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई केली.
या कारवाई बाबतच्या मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता वैभव नागणे याच्या वाळू रॅम्पवर दोन टिप्परमध्ये वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले. सदर ठिकाणी अंदाजे शंभर ब्रास वाळूचा साठा आढळून आला असून अवैधरित्या वाळू उत्खननसुरू असल्याचे स्पष्ट झाले.
कारवाई दरम्यान पोलीस पथकानेजेसीबी मशीन थांबविण्याचा प्रयत्न केला असता संबंधित जेसीबी चालक तसेच एका यारीट्रॅक्टर चालकाने पोलीस पथकास पाहून वाहनांसह घटनास्थळावरून पळ काढला.संबंधितआरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणीसंबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचीप्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस विभागामार्फत करण्यात येत आहे. अवैध वाळूउत्खनन व वाहतुकी विरोधात पोलीस प्रशासनाकडून पुढीलकाळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
————-
चौकट : (पोलिसांना घटनास्थळी आढळुन आलेल्या वाहनांचा तपशील पुढील प्रमाणे) टिप्पर (क्र. बीआर०२जीए३१८९) चालक – गणेशगांडुळे, मालक – प्रकाश गायकवाड तसेच दुसऱ्या टिप्परचा क्रमांक उपलब्धनाही त्याचा चालक – सिद्धू लाला कांबळे तसेच घटनास्थळावरून पळून गेलेल्याजेसीबीचा मालक नागेश आसबे, रा. गोपाळपूर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Post Views: 27