सोलापूर – वनवास पावसाळा तोंडावर आहे तरी नाले दुरुस्तींची कामे झाले नाहीत. विजय नगर पासून दीक्षित नगर पर्यंत वाहणाऱ्या नाला आणि दीक्षित नगर वाशी यांचा पुन्हा पुन्हा पावसाळ्यात होणारा वनवास हे वर्षानुवर्षे चालतच आहे आणि कधीपर्यंत चालत राहील माहित नाही. शहरातील नाले दुरुस्तीसाठी नगरपालिका अंतर्गत 99 कोटीचे टेंडर मंजूर झाले असून लातूरच्या शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीला हे टेंडर देण्यात आले आहे. मागच्या वर्षी जून महिन्यापासून नाल्यांचे सर्वेचे काम सुरू झाले परंतु अध्यापही नाले दुरुस्तीचे काम सुरू नसल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनल दास यांनी केला आहे.
विजय नगर पासून दीक्षित नगर पर्यंत वाहत येणारा नाला स्वागत नगरच्या मागील बाजूस जैतूनबी शाळेच्या मालकाने नाल्याच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणामुळे नाला बुजवण्यात आला. त्यामुळे या नाल्याचे पाणी दुसरीकडे वळवल्यामुळे पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की नाल्याचे पाणी दीक्षित नगर, शोभा देवी नगर या परिसरामध्ये वाहत जाते आणि त्याचा प्रवाह इतका असतो की ते पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरते. मागच्या तीन ते चार वर्षांपासून दीक्षित नगरचा या नाल्यासाठी मी महानगरपालिकेचा पाठपुरावा करत आहे महानगरपालिकेत पत्र दिलं की दोन तीन महिन्यांमध्ये नाला दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे असे सांगतात आणि पावसाळा तोंडावर आला की आता पावसाळा आहे त्यामुळे नाला दुरुस्तीचे काम करता येत नाही असे सांगतात.
मागील चार वर्षांपासून हेच चक्र सुरू आहे महानगरपालिकेचे हे गलथान काम कधी थांबणार आहे माहिती नाही. महानगरपालिकेच्या या ढिसाळ कामामुळे दीक्षित नगर मधील लोकांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये राहते घर सोडून निघून जाण्याची वेळ येते. रोजचं सांडपाण्यात पावसाचे पाणी मिसळून घरात शिरते. त्यामुळे हे पाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त अस्वच्छ असते त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडते.त्याठिकाणी राहणं हे मुश्किल होतं अत्यंत जीवघेणं काम या महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. महानगरपालिका प्रशासन कधी जागा होणार काय माहित दीक्षित नगर मधील रहिवासी प्रशासनाच्या जागे होण्याची वाट पाहत आहेत.

















