पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त 304 जणांनी केले रक्तदान
सोलापूर : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने भवानी पेठ परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जाणवत असलेल्या रक्तटंचाईची गरज ओळखून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल ३०४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.
अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शिबिर पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेवक प्रथमेश कोठे, माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष-अखिल भारतीय बेरड समाज संघटना बाबुराव जमादार, अहिल्यादेवी पथसंस्थेचे चेअरमन नागनाथ कोळेकर यांच्यासह शरणप्पा डोळे, सायबण्णा मुडल, बसवराज जाटगल, बंडोपंत डोळे, अंम्पण्णा पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सूर्यप्रकाश कोठे म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजसेवा, लोककल्याण आणि न्यायप्रिय प्रशासनाचा आदर्श देशासमोर ठेवला. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबविणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे. सध्या उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून रक्तदान ही काळाची गरज बनली आहे.
माजी सभागृह नेते सुरेश पाटील म्हणाले , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हे समाजहित, धर्मकार्य आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी समर्पित होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे त्यांच्या नेतृत्वाखालील युवा कार्यकर्त्यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, नागेश सरगम, ज्ञानेश्वर म्याकल, सुरज पाटील, नरसप्पा मंदकल, मल्लेश मासरेड्डी, यशवंत पुराणीक, बसवराज रूपनर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बिपीन पाटील, यशवंत पुराणीक, रवी मंदकल, विनायक पाटील, बसवराज कर्ली, अमर गंजेळी, यासिन नालवार, अफसर नालवार, गोपाल कुर्ले, लिंगराज मासरेड्डी, सिद्धारुढ गंधाळकर, जमीर शेख, सुरेश मंदकल, अप्पी पुजारी, प्रभू कोळी, सिद्राम हळ्ळी, प्रविण डोळ्ळे, गंगाराम डोळ्ळे, शिव मंदकल, अविनाश सोल्लगी, रेवण वग्गुर, दिपक करली, व्यंकटेश जाटगल, लक्ष्मण पुजारी, विजय कोळी, अक्षय साळुखे, संतोष करली आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 19