सोलापूर : प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर येथील प्रबुद्ध भारत विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त पी.बी. ग्रुप च्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रथमतः सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन माता रमाई यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अक्षय मस्के, गौतम शिंदे, भीमा मस्के, मिलिंद तळभंडारे, देविदास मुनगल, आदित्य साबळे व पी.बी. ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 13