बार्शी – करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील ‘विश्वकर्मा तरुण मंडळाच्या’वतीने दिला जाणारा १५-१६ वा राज्यस्तरीय गावगाडा कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक पुरस्कार सोहळा पुण्यात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यामध्ये बार्शी येथील मॉडेल हायस्कूलचे शिक्षक प्रताप दुधाजीराव दराडे यांना मानाचा राज्यस्तरीय गावगाडा पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. याच सोहळ्यात लेखक मुकुंदराज कुलकर्णी यांच्या नाथ मंदिरांतील दिवस या ललित लेखनास ‘गावगाडा साहित्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी पुणे येथील सदाशिव पेठ, लोकमान्य वाचनालयाजवळ, मसाप (महाराष्ट्र साहित्य परिषद) पुणे समोरील गल्लीतील चाफेकर रस्ता, रामबाग कॉलनी येथील ‘अक्षरवेल सभागृह’ येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका
सिंह उपस्थित होत्या.या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (पुणे) चे आयुक्त गजेंद्र बावणे आणि जेऊर येथील भारत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय चौधरी उपस्थित होते. तसेच अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ (पुणे जिल्हा) चे अध्यक्ष रवींद्र किसन रायकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी अध्यक्ष मोनिका सिंह, मुकुंदराज कुलकर्णी, प्रा. डॉ. संजय चौधरी व इतर पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे नेटके व उत्कृष्ट नियोजन अध्यक्ष सोमनाथ टकले, बाबुराव इंगळे, दत्तात्रय पिसाळ आणि डॉ. जनार्दन भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले.
प्रताप दराडे यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गणित मंडळ, विज्ञान मंडळ, शैक्षणिक क्षेत्रातील सहकारी व बार्शी परिसरातील नागरिकांकडून त्यांचे जाहीर कौतुक व अभिनंदन होत आहे.
Post Views: 12