Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ना शिष्यवृत्ती… ना शासकीय मदत; जिद्दीच्या बळावर धीरज अमेरिकेत इंजिनिअर

तरुण भारतbyतरुण भारत
May 29, 2026
in solapur
0
ना शिष्यवृत्ती… ना शासकीय मदत; जिद्दीच्या बळावर धीरज अमेरिकेत इंजिनिअर
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : घरची परिस्थिती साधी… परदेशी शिक्षणाचे मोठे स्वप्न… ना शासकीय मदत, ना शिष्यवृत्ती… तरीही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर सोलापूरच्या धीरज राज सुरते यांनी अमेरिकेत केमिकल इंजिनिअर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत कुटुंबासह शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. सोलापूरच्या सुपुत्राने वडिलांच्या कर्जाची, संघर्षाची यशातून परतफेड केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सुरते–स्वामी परिवाराच्या वतीने आयएमए हॉल येथे भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात गौरव समारंभ पार पडला.
        यावेळी एआय इंजिनिअर म्हणून यश मिळविल्याबद्दल तन्मय राज सुरते याचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास जाईबाई सुरते, राज सुरते, योगिता सुरते, ॲड. नितीन स्वामी, ॲड. कालिंदी सुरते–स्वामी, उमेश सुरते, वर्षा सुरते, डॉ. शैलेश सुरते, अनुराधा सुरते, सामाजिक कार्यकर्ते देवा उघडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
           अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून धीरज सुरते यांनी मास्टर ऑफ सायन्स इन केमिकल इंजिनिअरिंग ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. विशेष म्हणजे या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात त्यांना कोणतीही शिष्यवृत्ती किंवा शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही. तरीही मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील राज सुरते यांनी स्वतःचा ट्रॅव्हल व्यवसाय, बँकेचे कर्ज आणि मित्रांच्या सहकार्याच्या जोरावर आर्थिक जबाबदारी पेलली.अडचणी, आर्थिक संकटे आणि अनिश्चिततेच्या सावटातही धीरज यांनी हार मानली नाही. दिवस-रात्र अभ्यास, अपार मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी अमेरिकेतील नामांकित मिशिगन विद्यापीठात शिक्षण पूर्ण केले आणि त्याच देशात प्रतिष्ठेची नोकरी मिळवत यशाचे शिखर गाठले, असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.
      संघर्षावर मात करून स्वप्न पूर्ण करणारा हा युवक आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. धीरजने केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे तर सोलापूरचेही नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे, अशा भावना मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, संजय शिंदे, प्रा. डॉ. शीला हिरेमठ, देवा उघडे, पत्रकार किरण बनसोडे आदींनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.
           कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत ॲड. कालिंदी सुरते यांनी केले. प्रास्ताविक अनुराग सुतकर यांनी केले. सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले तर सतीश शेंडगे यांनी आभार मानले. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी सर्व नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण केले : धीरज सुरते
वडिलांचे स्वप्न होते की मी परदेशात इंजिनिअर व्हावे. शिष्यवृत्ती मिळाली नाही तरीही न डगमगता वडिलांनी कर्ज काढून अमेरिकेत शिक्षणासाठी पाठविले. अडचणी आल्या पण खचलो नाही. अथक अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अमेरिकेत इंजिनिअर होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आजीसह सर्व कुटुंबियांचे पाठबळ मिळाले. त्यांच्या संस्कारामुळेच मी आज घडलो. इथपर्यंत आलो, अशी कृतज्ञतेची भावना सत्कारमूर्ती इंजिनीयर धीरज सुरते यांनी व्यक्त केली.
Post Views: 24
Previous Post

बार्शीचे प्रताप दराडे यांना राज्यस्तरीय ‘गावगाडा पुरस्कार’

Next Post

सोलापूर जि.प.मध्ये ३१ मे रोजी ३३७ कर्मचारी सेवानिवृत्त !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूर जि.प.मध्ये ३१ मे रोजी ३३७ कर्मचारी सेवानिवृत्त !

ताज्या बातम्या

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026
क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

June 13, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील वीजप्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील वीजप्रश्नावर आमरण उपोषणाचा इशारा

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन; भीमानगर चौकात जंगी सत्कार

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0908782

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697